Home सामाजिक एचडीएफसी लाइफतर्फे एचडीएफसी लाइफ क्लिक 2 अचिव्ह सादर

एचडीएफसी लाइफतर्फे एचडीएफसी लाइफ क्लिक 2 अचिव्ह सादर

4 second read
0
0
22

no images were found

एचडीएफसी लाइफतर्फे एचडीएफसी लाइफ क्लिक 2 अचिव्ह सादर

मुंबई : एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्या विमाकर्त्यांतर्फे एचडीएफसी लाइफ क्लिक 2 अचिव्ह हे नवीन प्रोडक्ट सादर करण्यात आले आहे. हा एक खात्रीशीर सेव्हिंग लाइफ इन्श्युरन्स प्लॅन आहे. आपल्या आप्तेष्टांचे भविष्य सुरक्षित करणे आणि त्यांची आर्थिक ध्येये साध्य करण्याच्या दृष्टीने हा प्लॅन साकारण्यात आला आहे. तुमच्या पोर्टफोलियोमध्ये एचडीएफसी लाइफ क्लिक 2 अचिव्ह समाविष्ट का करावा?

 पॉलिसी घेतल्याच्या पुढच्या महिन्यापासून खात्रीशीर तत्काळ उत्पन्न घेता येऊ शकते
 हा प्लॅन पूर्णपणे लवचिक आहे – अर्ली इन्कम, लाँग टर्म इन्कम, एकरकमी किंवा पिरियड लम्पसम (मनी बॅक) या
प्रकारांमध्ये लाभ मिळविण्याच्या दृष्टीने या प्लॅनमध्ये बदल करता येऊ शकतो.
 फ्लेक्झिबल विमा रक्कम व रायडर लाभांसह तुम्ही सुरक्षेची पातळी ठरवू शकता.
एचडीएफसी लाइप क्लिक 2 अचिव्हची ठळक वैशिष्ट्ये कोणती?
 अतिरिक्त खात्रीसह तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले कॅशफ्लो निश्चित करण्याची क्षमता
 वाढत्या उत्पन्नाच्या पर्यायासह^ तुम्ही तुमच्या उत्पन्नावर होणारा महागाईचा परिणाम कमी करू शकता.
सेव्हिंग बॅँक अकाउंट + 1.5% या दराने तुमचे सर्व्हायव्हल लाभ वाढविण्याची लवचिकता
 आरओपीची (रिटर्न ऑफ प्रीमियम) रक्कम आणि ज्या वर्षी तुम्हाला तो परत हवा आहे ते वर्ष निवडण्याची मुभा*

या लाँच बद्दल एचडीएफसी लाइफच्या प्रोडक्ट अँड सेगमेंट विभागाचे प्रमुख अनीश खन्ना म्हणाले, प्रत्येक गोष्ट एका स्वप्नाने सुरू होते. स्वप्न कितीही मोठे असले तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला सुरक्षित पाऊल उचलून सुरुवात करावी लागते. त्याचप्रमाणे नियमित बचत व नियोजन करून तुम्ही आयुष्यातील ध्येयांची पूर्तता करू शकता. एचडीएफसी लाइफ क्लिक 2 अचिव्ह प्रोडक्टसह तुम्ही तुमची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पहिले सुरक्षित पाऊल उचलू शकता. गॅरेंटीड रिटर्न्सची # खात्री देत तुमची स्वप्ने पूर्ण करण्यास सक्षम करण्यासाठी हा प्लॅन तुम्हाला अगणित कॉम्बिनेशन्स देऊ करतो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…