no images were found
नेस्ले इंडियाला ‘बेस्ट इंडस्ट्री – प्रॉडक्ट इनोव्हेशन फॉर मेनस्ट्रीमिंग मिलेट्स‘ पुरस्कारासह सन्मानित
मुंबई–नेस्ले इंडियाला बहुप्रशंसित ‘इंटरनॅशनल न्यूट्री-सेरेअल कन्वेंशन ५.०‘दरम्यान न्यूट्रीहब, आयसीएआर-आयआयएमआरने ‘बेस्ट इंडस्ट्री – प्रॉडक्ट इनोव्हेशन फॉर मेनस्ट्रीमिंग मिलेट्स‘ पुरस्कारासह सन्मानित केले आहे.न्यूट्रीहब,आयआयएमआर-आयसी
मिलेट्सच्या त्वरित अवलंबतेबाबत मत व्यक्त करत नेस्ले इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेश नारायणन म्हणाले, ”नेस्ले इंडियाला ‘बेस्ट इंडस्ट्री – प्रॉडक्ट इनोव्हेशन फॉर मेनस्ट्रीमिंग मिलेट्स‘ पुरस्कार मिळाल्याने सन्माननीय वाटत आहे. या सन्मानामधून देशभरातील ग्राहकांना पौष्टिक व आरोग्यदायी खाद्य पर्याय देण्याप्रती आमची कटिबद्धता, तसेच या दृष्टीकोनाला प्रत्यक्षात आणण्याप्रती नेस्ले इंडिया टीमचा निर्धार दिसून येतो. मला आनंद होत आहे की, आम्ही मिलेट-आधारित उत्पादने जसे नेस्ले ए + मसाला मिलेट विथ बाजरा, नेस्ले सेरेग्रो ग्रेन सिलेक्शन विथ रागी, मॅगल ओट्स नूडल्स यांसह मिलेट मॅजिक विथ जवार व रागी लाँच केले आहेत. मी मिलेट्सना प्रकाशझोतात आणण्यामध्ये आणि २०२३ ला इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्स करण्यामध्ये साह्य करण्यासाठी भारत सरकारचे आभार व्यक्त करण्यासह अभिनंदन करतो. आमचा विश्वास आहे की, मिलेट्स म्हणजेच ‘श्री अन्न‘ला प्रकाशझोतात आणण्याची ही गती कॉर्पोरेट्स, शैक्षणिक संस्था व प्राधिकरणांसोबतच्या सहयोगाच्या माध्यमातून शाश्वतपणे कायम राहिल.”
न्यूट्रीहबचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. बी दयाकर राव म्हणाले, ”न्यूट्रीहब, आयसीएआर-आयआयएमआर आणि पोषक अनाज पुरस्कार समितीच्या वतीने मी नेस्ले इंडियाचे मिलेट्सच्या क्षेत्रात त्यांची अविरत समर्पितता व महत्त्वपूर्ण योगदानासाठी मन:पूर्वक अभिनंदन करतो.”नेस्ले इंडियाच्या मिलेट्सचा प्रचार करण्याप्रती उपक्रमांमधून शाश्वत व वैविध्यपूर्ण खाद्य पर्यायांना चालना देण्याप्रती, तसेच कृषी क्षेत्राच्या भल्यासाठी योगदान देणारे आणि सकारात्मक सामजिक प्रभाव निर्माण करणारे शेतकरी व स्थानिक समुदायांना पाठिंबा देण्याप्रती त्यांची कटिबद्धता दिसून येते. मिलेट्स एसडीजी ध्येये संपादित करण्यासाठी महत्त्वाचे आहेत, जसे एसडीजी-३, जे उत्तम आरोग्य व स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करते, जबाबदार वापर व उत्पादनासंदर्भात एसडीजी-४ आणि हवामान कृतीवरील एसडीजी-५. नेस्ले इंडियाचे मिलेट-केंद्रित धोरण खाद्य उद्योगावर मोठ्या प्रमाणात प्रभाव निर्माण करण्यास आणि ग्राहकांसाठी अधिकाधिक शाश्वत खाद्य पर्यायांना चालना देण्यास स्थित आहे.