no images were found
अनाधिकृत, विना परवाना जाहिरात फलक आढळलेस ते जप्त करुन गुन्हा नोंद होणार
कोल्हापूर : शहरात अनाधिकृत, विनापरवानी जाहिरात फलक आढळलेस ते जप्त करुन संबंधीतांवर गुन्हा नोंद केला जाणार आहे. मा.उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्र.155/2011 चे प्रभाविपणे अमंलबजावणीसाठी वेळो-वेळी कोल्हापूर शहरात अवैध, अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा फलक इत्यादी काढण्याची कार्यवाही करण्यात येत असते. तसेच तात्पुरत्या जाहिराती, वाढदिवस शुभेच्छा, श्रध्दांजली असे फलक लावण्यासाठी संबंधीत विभागीय कार्यालय क्र.1 ते 4 येथे अर्ज केल्यास सशर्त परवानगी देण्यात येते. या व्यतिरिक्त अनाधिकृत, विनापरवाणा जाहिरात फलक आढळलेस ते जप्त करुन सबंधीतावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत तसेच महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम 1995, कलम 3 व 4 नुसार कारवाई केली जाते. या कारवाई नंतर सदरचा मुद्देमाल जप्त करुन पोलिस ठाणेत गुन्हे दाखल केला जाणार आहे. तरी शहरामध्ये अनाधिकृत, विनापरवानगी जाहिराती लावण्यात येऊ नयेत असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. अशा जाहिराती आढळलेस सामान्य नागरीकांनी 0231-2545472 तसेच एस.एम.एस. करण्यासाठी 9766532032 व व्हाटस्ॲप क्रं. 9822598387, 7721875552 या नंबरवर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. नागरीकांच्या तक्रार आल्यानंतर तात्काळ संबंधीत अवैध, अनाधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा फलक इत्यादी जप्त करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल.