Home शैक्षणिक रसायनशास्त्र विभागात दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

रसायनशास्त्र विभागात दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

2 second read
0
0
19

no images were found

रसायनशास्त्र विभागात दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

औद्योगिक रसायनशास्त्र व मध्यवर्ती रोजगार कक्ष यांच्या सयूंक्त विद्यमाने पंतप्रधान उच्‍चतर शिक्षण अभियान (PM-USHA) अंतर्गत दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. २५ आणि २६ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यशाळेमध्ये १५० हून अधिक एम.एस्सी. (रसायनशास्त्र) विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांचे कौशल्यवर्धन आणि त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी तयारी करणे हा होता.

कार्यशाळेमध्ये अनेक ख्यातनाम वक्त्यांनी व्यावसायिक विकासावर आधारित उपयुक्त व्याख्याने घेतली.

श्री. दीपक दळवी यांनी कॉर्पोरेट संस्कृतीवर प्रभावी आणि विचारप्रवर्तक व्याख्यान घेतले. त्यांच्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना नौकरीच्या ठिकाणी होणाऱ्या घडामोडी, व्यावसायिक शिष्टाचार आणि वैयक्तिक मूल्ये आणि संस्थेच्या उद्दिष्टांशी जुळवून घेण्याचे महत्त्व समजावून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट वातावरणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ज्ञान दिले.

श्री. गणेश कुलकर्णी यांनी रिझ्युम लेखन आणि मुलाखत तंत्रज्ञानावर व्यावहारिक सत्र घेतले. त्यांच्या सत्रात प्रभावी रिझ्युम कसा तयार करावा आणि मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी आवश्यक तंत्रे याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी दिलेल्या विविध उदाहरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये
आत्मविश्वास निर्माण झाला.

डॉ. अरविंदेकर यांनी अपेक्षा व्यवस्थापनावर प्रभावी सत्र घेतले. त्यांच्या सत्रात वैयक्तिक आणि व्यावसायिक अपेक्षांचे संतुलन राखण्याचे महत्त्व स्पष्ट केले आणि करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय कसे ठरवावे यावर भर दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना संयम, अनुकूलता आणि स्पष्ट संवाद साधण्याचे महत्त्व समजावले .

दोन दिवसीय कार्यशाळा माहितीपूर्ण आणि संवादात्मक होती. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि विविध वक्त्यांशी सखोल चर्चा करून त्या विषयांवर अधिक माहिती मिळवली. या कार्यशाळे मुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकण्याची संधी मिळाली. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ कैलास सोनवणे, औद्योगिक रसायनशास्त्र समनव्यक प्रा डॉ गजानन राशीनकर, प्रा. डॉ. के. एम. गरडकर, डॉ
राहुल माने, डॉ अविराज कुलदीप, डॉ शिवानंद तेली, डॉ नवनाथ वलेकर, डॉ क्रांतिवीर मोरे यांनी परिश्रम घेतले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…