
no images were found
अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ई पासबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय
कोल्हापूर : कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. दहीहंडी, गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार आहे. नवरात्र उत्सवात कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांना कोणतेही निर्बंध नसतील. यंदाचा नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात पार पडणार आहे.
राज्यावर गेल्या दोन वर्षात कोरोनाचे संकटामुळे धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी निर्बंध घालण्यात आले होते. या निर्बंधांचा परिणाम नवरात्र उत्सवावर मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता. मात्र यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.
नवरात्रोत्सवासाठी मंदिरात पासची सक्ती नाही
गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावणात पार पडणार आहे. कोरोना काळात भक्तांना ई पासची सक्ती होती. यावर्षी मंदिर प्रशासनाकडून ई पासबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ई पासची आवश्यकता नाही. ई पासची सक्ती उठवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. नवरात्रोत्सवात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापूरत दाखल होतात. दर्शनासाठी भाविकांची गेले दोन वर्ष राज्यावर कोरोनाचे सावट असल्याने या गर्दीला पूर्णविराम लागला होता. यंदा कोरोनाची लाट ओसरल्यामुळे भाविक दर्शनाला गर्दी करण्याची शक्यता असल्यामुळे भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.