एड्स दिनानिमित्त न्यु वुमन्स फार्मासिने केली जनजागृती
कोल्हापूर (प्रतिनीधी ) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित, न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी जागतिक एड्स दिनानिमित्त समाजात एचआव्ही संसर्गाविषयी जागरूकता करण्यासाठी यावर्षी जागतिक थीम कम्युनिटी लीड (एड्स रोखण्यासाठी समाजाची महत्वाची भूमिका) त्यास अनुसरून विद्यार्थिनींनी न्यू कॉलेज परिसर, बिनखंबी गणेश मंदिर, शिवाजी पेठ परिसर गर्ल्स हायस्कूल अशा विविध ठिकाणी एड्स संसर्गविषयी जागरुकता, रोगांपासून स्वतःच संरक्षण कसे करावे, रोगविषयीच्या अंधश्रद्धा, घ्यावयाची काळजी v त्यावरील उपाय यांच्यावर पथनाट्यातून प्रबोधन केले. या बरोबरच प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.
सदरचा उपक्रम कॉलेजचे प्राचार्य डॉ रविंद्र कुंभार यांच्या मार्गद्शनाखाली व प्रा. वैष्णवी निवेकर , प्रा. दिव्या शिर्के, प्रा. पियुशा नेजदार यांच्या नियोजनाने संपना झाला
उपक्रम सादर करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. बी.जी.बोरोडे, चेअरमन श्री के.जी. पाटील, व्हा. चेअरमन डी.जी. किल्लदार यांचे विशेष प्रोत्साहन लाभले.
सदरच्या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थिनीं, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. वैष्णवी निवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.