no images were found
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील दरिद्रय रेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिअधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने थेट कर्ज योजने अंतर्गत रक्कम रु. 1 लाख पर्यंत वाढविण्यात येऊन थेट कर्ज योजना राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा कार्यालय कोल्हापूर मार्फत थेट कर्ज योजनेमध्ये कर्ज मागणी अर्ज वितरण दिनांक 25 डिसेंबर 2023 पर्यंत करण्यात येणार असून कागदपत्रांच्या पुर्ततेसह परिपुर्ण अर्ज 25 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एच.चव्हाण यांनी केले आहे.
थेट कर्ज योजने अंतर्गत रक्कम रु.1 लाख पर्यंतचे प्रकल्प मर्यादेपर्यंत असलेले लघु उद्योग करता येतील. थेट कर्ज योजनेअंतर्गत महामंडळाचा हिस्सा रु. 85000 (85%), अनुदान रक्कम रु.10000(10%) व अर्जदाराचा सहभाग रु.5000(5%) असे एकूण रक्कम रु.1,00,000/- (100%), वितरीत करण्यात येतात.
सन 2023-24 या वित्तीय वर्षासाठी उद्दष्टि प्राप्त झाले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हयासाठी भौतिक उद्दिष्ट 50 लाभार्थीं व आर्थिक उद्दिष्ट 42.50 लाख व अनुदान रक्कम रु.5.00 लाख असे आहे.