
no images were found
भुजबळ साहेब तुम्ही राजीनामा द्या– बाळासाहेब कापरे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा आणि वेगळी संघटना स्थापन करावी अशी मागणी बहुजन विकास संघटनेचे बाळासाहेब कापरे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे आरक्षणाचा मुद्द्यावर आक्रमक झाले असून त्यांना रोज जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काल पुण्यातल्या शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम होता. त्यादरम्यान स्वराज संघटनेच्या धनंजय जाधव यांनी शासकीय विश्रागृहत येऊन माध्यमांसमोर भुजबळ यांचा गाडी फोडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त विश्रामगृह येथे लावलेला पाहायला मिळत आहे. सोबतच समर्थक ही मोठ्या संख्येने एकवटले आहेत.
बाळासाहेब कापरे म्हणाले की, काल स्वराज्य संघटने काल भुजबळ साहेबांवर हाल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या निषेधार्थ आम्ही येथे आलो आहोत. भुजबळ साहेबांना कोणी हात लावला किंवा कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आम्ही एकवटलो आहोत. आणि भुजबळ साहेबांनी आता महाराष्ट्रातल्या सगळ्या १८ पगड जातींसाठी पक्ष काढावा, आणि या सर्व समजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आणि याबाबतच निवेदन ही आम्ही त्यांना देणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांनी राजीनामा द्यावा कारण राष्ट्रवादी ही फक्त मराठ्यांची संघटना आहे. तिथे इतर कुठल्या समजाला प्राधान्य दिलं जातं नाही. म्हणून साहेबांनी बहुजन करता पक्ष काढून न्याय द्यावा अशी सर्व समर्थकांची मागणी आहे असे बाळासाहेब कापरे म्हणाले.