Home राजकीय पुण्यात शासकीय विश्रामगृहाबाहेर राडा; मराठा आणि भुजबळ समर्थक कार्यकर्ते आमने-सामने

पुण्यात शासकीय विश्रामगृहाबाहेर राडा; मराठा आणि भुजबळ समर्थक कार्यकर्ते आमने-सामने

7 second read
0
0
35

no images were found

पुण्यात शासकीय विश्रामगृहाबाहेर राडा; मराठा आणि भुजबळ समर्थक कार्यकर्ते आमने-सामने

 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आता मराठा आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद वाढताना दिसत आहे. रविवारी हिंगोली येथील ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती बरखास्त करण्याची मागणी केली. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
     दरम्यान, रविवारी रात्री छगन भुजबळ हे पुण्यातील शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला होते. सोमवारी सकाळी स्वराज्य संघटनेचे कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाबाहेर घोषणाबाजी केली. तसेच भुजबळ यांची गाडी फोडण्याचा इशाराही त्यांनी दिला. वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते, असं स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव म्हणाले.
      त्यानंतर भुजबळ समर्थक कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी शिवीगाळ आणि अपशब्द वापरले. मराठा आणि भुजबळ समर्थक कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे पुण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
      राज्यात कायद्याचं राज्य आहे. आम्ही असल्या धमक्या खपवून घेणार नाही. आम्ही पूर्णपणे छगन भुजबळांच्या पाठिशी आहोत. ज्यांनी भुजबळांच्या गाडी फोडण्याची धमकी दिली, त्यांचा भटक्या विमुक्त आणि ओबीसी आरक्षण समितीच्या वतीने जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया एका भुजबळ समर्थक पदाधिकाऱ्याने दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डॉ. आंबेडकर यांना लोकशाहीकडे नेणारे शिक्षण अभिप्रेत: डॉ. गौतम गवळी

डॉ. आंबेडकर यांना लोकशाहीकडे नेणारे शिक्षण अभिप्रेत: डॉ. गौतम गवळी   कोल्हापूर,(प्रति…