
no images were found
तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे
सोनी सबवरील तेनाली रामा या समस्त कुटुंबाला रिझवणाऱ्या मनोरंजक मालिकेने 100 भाग पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. सुरू झाल्यापासून या मालिकेने बुद्धीचातुर्य आणि सुजाणता यांचे मिश्रण करणाऱ्या सुरस कथा सादर करून सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विजयनगर सम्राज्याच्या पार्श्वभूमीवरील ही मालिका जीवनाकडे बघण्याचा एक चतुर आणि सुजाण दृष्टिकोन देत आजही प्रेक्षकांना गुंतवून ठेवत आहे.
या मालिकेत महान पंडित आणि कवी तेनाली रामा (कृष्ण भारद्वाज) च्या जीवनातील कथा सादर करण्यात येत आहेत. तो राजा कृष्णदेवरायाचा दरबारी असून आपल्या कुशाग्र बुद्धीने आणि हजरजबाबी स्वभावाने अनेक आव्हानात्मक प्रसंगातून मार्ग काढताना दिसतो. प्रत्येक भागात, त्याच्यापुढे एक नवीन आव्हान असते आणि तेनाली रामा अत्यंत अवघड आणि जटिल परिस्थितीवर देखील आपल्या हुशारीने तोडगा काढतो, ज्यातून बऱ्याचदा प्रेक्षकांना एक मोलाचा संदेश देखील मिळतो.
हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याचा आनंद व्यक्त करताना तेनालीची भूमिका करणारा कृष्ण भारद्वाज म्हणतो, “या सेटवर मी पहिल्या दिवशी पाऊल ठेवले, तो दिवस मला आजही आठवत आहे. आणि यावेळी तेनाली रामाच्या रूपात केवळ हुशार आणि विनोदी नायक परतलेला नाही. गेल्या 100 भागांच्या प्रवासात तेनाली ही व्यक्तिरेखा इतकी मोठी झाली आहे की, तेनाली आता केवळ दैनंदिन समस्या सोडवत नाही, तर आपल्या बुद्धीचातुर्याच्या आणि सुजाणतेच्या बळावर तो आपल्या राज्यावर आलेल्या संकटात राज्याचे आणि प्रजेचे रक्षण देखील करत आहे. कधी तो आपल्या शत्रूवर चतुरपणे कुरघोडी करतो, तर कधीकधी तो इतरांच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालतो. हा तेनाली अधिक ठरेल आणि निश्चयी आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पदारांचा शोध घेताना खूप आनंद होत आहे, आणि खरं सांगतो, कधीकधी तर तो मला देखील आश्चर्याचा धक्का देतो!”