Home शासकीय राष्ट्रपती दौऱ्यासाठी वाहतुक नियमन आदेश जारी

राष्ट्रपती दौऱ्यासाठी वाहतुक नियमन आदेश जारी

0 second read
0
0
35

no images were found

राष्ट्रपती दौऱ्यासाठी वाहतुक नियमन आदेश जारी

कोल्हापूर, : जिल्ह्यामध्ये दिनांक 28 जुलै 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जिल्हा दौरा मार्ग कोल्हापूर विमानतळ ते श्री अंबाबाई दर्शन ते सर्कीट हाऊस ते ताराराणी चौक ते तावडे हॉटेल ते वारणानगर कोडोली ते परत कोल्हापूर विमानतळ असा असणार आहे. यावेळी अनेक राजकीय नेते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर विमानतळ ते श्री अंबाबाई दर्शन ते सर्कीट हाऊस ते ताराराणी चौक ते तावडे हॉटेल ते वारणानगर कोडोली ते परत कोल्हापूर विमानतळ या दरम्यानच्या मार्गावर मोटार वाहनांची वाहतुक सुरळीत ठेवण्याकरिता व नागरिक, पादचारी यांना सुरक्षितता प्रस्थापित व्हावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता वन वे मार्ग शिथिल करणे, आवश्यकतेनुसार वाहतुक सुरु-बंद करणे अगर वळविणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 (1) अन्वये वाहतुक नियमन निर्देश व आदेश जारी केले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…