Home Uncategorized पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

31 second read
0
0
22

no images were found

पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर : जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने ज्या योजना सुरू आहेत त्या लवकरात लवकर कार्यान्वित कराव्यात तसेच या योजना कार्यान्वित करताना स्थानिक प्रशासनाला विश्वासात घ्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी  दिले.

         जिल्हाधिकारी कार्यालयात आज जल जीवन मिशन,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते .           यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमिन, जिल्हा प्रकल्प संचालक जलजीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता )जि.प .माधुरी परीट, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर ,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे प्रामुख्याने उपस्थित होते

            जिल्हाधिकारी म्हणाले, मूळ DPR नुसार पाणीपुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्या स्थानांतरीत (हँण्ड ओव्हर) कराव्यात तसेच शासन स्तरावरून निधी उपलब्ध झाल्यानंतर 46 गावच्या ज्या योजना आहेत त्या कार्यान्वित कराव्यात. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जिल्ह्यात सध्या किती योजना सुरू आहेत ? त्याचे किती टक्के काम पूर्ण झाले आहे ? तसेच त्याची सद्यस्थिती काय ? याबाबत विचारणा करून पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने  आवश्यक त्या ठिकाणी जिल्हा नियोजन (डीपीडीसी) मधून निधी देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तसेच या बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी पुढील बैठकीपर्यंत पूर्ण करावी असे आदेश दिले.

               जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या सह अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.    जॅसमिन म्हणाल्या, या विभागाद्वारे ज्या योजना पूर्ण आहेत त्या योजना हँड ओव्हर करा म्हणजे रिवाईज करण्याचा प्रश्नच येणार नाही तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी घन कचऱ्याबाबत जिल्ह्यात 5 कामे अपूर्ण असून 2 कामे नव्याने सामिल करण्यात आले असल्याची माहिती यावेळी दिली.

     या बैठकीत पी.ए कराड,पी के आलटकर, सचिन देशमुख,तुषार चौगुले,हेमंतकुमार मदवाने, डी एस पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील उप कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु) सहभागी झाले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

बीपीसीएलकडून महाराष्ट्रात भारतगॅस लाइट झिपचा शुभारंभ

बीपीसीएलकडून महाराष्ट्रात भारतगॅस लाइट झिपचा शुभारंभ     मुंबई, कल्याण, रायगड, प…