no images were found
स्कोडा ने कुशक व स्लाव्हियासाठी ऑल-न्यू डीप ब्लॅक रंगामध्ये एलीगन्स एडिशन्स लाँच
कोल्हापूर ,( प्रतिनीधी ) – कुशक व स्लाव्हियामध्ये अनेक नवीन आणि सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्ये सादर केल्यानंतर स्कोडा ऑटो इंडियाने या दोन्ही कार्सच्या नवीन, खास व्हर्जनची घोषणा केली आहे. एलीगन्स एडिशन नावाच्या या दोन्ही कार्स मर्यादित प्रमाणात उत्पादित करण्यात येतील आणि विशेषत: १.५ टीएसआय इंजिनसह उपलब्ध असतील.
नवीन प्रॉडक्ट अॅक्शनबाबत मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक पीटर सोलक म्हणाले, ”कुशक व स्लाव्हियाचे एलीगन्स एडिशन लिमिटेड ऑफरिंग म्हणून लाँच करण्यात येईल. क्लासिक ब्लॅक रंगामधील कुशक व स्लाव्हियासाठी प्रबळ मागणी आहे. आमच्या सर्व उत्पादन कृती सर्वसमावेशक ग्राहक ट्रेण्ड्सवर आधारित आहेत, तसेच आमच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाशी संलग्न आहेत. नवीन एलीगन्स एडिशन्सची आकर्षकता, बॉडी कलर व कॉस्मेटिक पैलू डिझाइनला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेतील, तसेच व्यापक मूल्य व अभिमानास्पद मालकीहक्काचा अनुभव देत राहतील.”
एलीगन्स एडिशन दोन्ही कार्समध्ये क्लासिक, ऑल-न्यू व आकर्षक डीप ब्लॅक पेंटसह येते, तसेच संपन्न क्रोम एलीमेण्ट कायम ठेवण्यात आले आहे. कुशकमध्ये १७-इंच (४३.१८ सेमी) वीईजीए ड्युअल टोन अलॉइ डिझाइन आहे, जी स्टाइल आणि खडतर प्रदेशातील स्टान्समध्ये अधिक भर करते. तसेच स्लाव्हियाच्या क्लासिक सेदान लाइन्सना साजेसे १६-इंच (४०.६४ सेमी) विंग अलॉई व्हील्स आहेत.
कुशक व स्लाव्हियाच्या एलीगन्स एडिशन्समध्ये विशेषत: १.५ टीएसआय टूर्बो-पेट्रोल इंजिनची शक्ती असेल. हे एडिशन्स ऑल-न्यू डीप ब्लॅक पेंटमध्ये असतील आणि पूर्णत: सुसज्ज, टॉप-ऑफ-द-लाइन स्टाइल व्हेरिएण्ट्सपेक्षा सर्वोत्तम असतील. मध्यभागी २५.४ सेमी इन्फोटेन्मेंट स्क्रिन आहे, ज्यामध्ये स्कोडा प्ले अॅप्स आहेत. सिस्टम वायरलेस्ली अॅप्पल कारप्ले व अँड्रॉईड ऑटोशी जोडलेली आहे. तसेच कुशक व स्लाव्हियाच्या एलीगन्स एडिशनमधील बूट क्षेत्रात प्रमाणित म्हणून ६ स्पीकर्स व सबवूफर असलले स्कोडा साऊंड आहे.