
no images were found
लोकसभेसाठी ठाकरे गटाचा मास्टर प्लान; १० विश्वासू नेत्यांवर सोपावली विशेष जबाबदारी
मुंबई/पुणे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसह शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे गटाने मास्टर प्लान आखला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या १० नेत्यांवर वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यामध्ये खासदार संजय राऊत, अनिल देसाई, राजन विचारे, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, सुनील प्रभू, भास्कर जाधव, विनायक राऊत यांच्यासह आमदार रवींद्र वायकर यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्व नेत्यांवर वेगवेगळ्या विभागाची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.