Home मनोरंजन गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त मालिकेतील कलाकारांनी घेतले  श्री दत्त पादुकांचे दर्शन

गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त मालिकेतील कलाकारांनी घेतले  श्री दत्त पादुकांचे दर्शन

17 second read
0
0
124

no images were found

गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त मालिकेतील कलाकारांनी घेतले  श्री दत्त पादुकांचे दर्शन

 

सांगली  : सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून या मालिकेच्या माध्यमातून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरते आहे. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले.अनेक यशस्वी भागांनंतरही ‘गाथा नवनाथांची’ ही सोनी मराठीवरील मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. आता मालिकेत नागनाथ आणि गुरुआई यांच्यातील युद्ध पाहायला मिळते आहे.

 

गाथा नवनाथांची मालिका आता लवकरच ८०० भागांचा टप्पा पूर्ण करेल. गोरक्षनाथ प्रकटदिनानिमित्त जयेश शेवळकर आणि नकुल घाणेकर यांनी नरसोबाची वाडी येथे श्रीदत्तपादुकांचे दर्शन घेतले. तेथे पूजा केली आणि अभिषेकही केला. मंदिरात कलाकारांना बघताच भाविकांनी गर्दी केली. मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या भूमिकेत हे कलाकार नेहमीच मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतात. आज साक्षात समोर पाहून भाविकांना मोह आवरला नाही. कित्येक भाविकांनी चक्क कलाकारांच्या पाय पडून नमन केले. कलाकारांना मिळालेले प्रेम पाहून तेही भावुक झाले. गोरक्षनाथ प्रकटदिनी आलेला हा अनुभव नक्कीच त्यांच्या लक्षात राहील. मालिकेतही गोरक्षनाथ प्रकटदिनी विशेष भाग पाहता येणार आहे. पाहायला विसरू नका ‘गाथा नवनाथांची’ सोम. ते शनि. संध्याकाळी ६.३० वाजता सोनी मराठी वाहिनीव

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …