no images were found
मालिका ‘भाबीजी घर पर है‘मध्ये विभुतीने अंगूरीला फाशीवर लटकवले
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है‘मधील विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले पात्र आहे. मनोरंजनपूर्ण कृत्यांसह त्याची शेजारी अंगूरी भाबीला (शुभांगी अत्रे) आकर्षित करण्याच्या त्याच्या प्रयत्नांनी नेहमीच प्रेक्षकांना आनंद दिला आहे. तिच्या निरागसपणाप्रती त्याच्या ओढीने मालिकेमध्ये रोमांचची भर केली आहे. पण प्रेक्षकांना मोठे सरप्राईज मिळणार आहे, जेथे आगामी कथानकामध्ये अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळेल. विभुती यमराज बनतो आणि नाट्यमय घटना घडू लागतात, जेथे विभुती अंगूरीला फाशीवर लटकवताना पाहायला मिळणार आहे. या धक्कादायक ट्विस्टबाबत विभुती नारायण मिश्रा ऊर्फ आसिफ शेख म्हणाला, ”विभुतीला विचित्र स्वप्न पडते, ज्यामध्ये तो यमराज असतो आणि अंगूरीला गुन्ह्यासाठी शिक्षा करतो. या विचित्र स्वप्नामुळे त्याला रात्री जाग येते आणि तो जोरात किंचाळतो. त्याच्या अशा वागणूकीचा अनिताला राग येतो आणि ती त्याला इतरांच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्यापासून दूर राहण्याची चेतावणी देते. तरीही या स्वप्नामुळे विचलित झालेला विभुती अंगूरीला कोणताही गुन्हा न करण्याचा सल्ला देतो, ज्यामुळे ती गोंधळून जाते. दरम्यान, तिवारी अंगूरीला खाद्यपदार्थांची मोठी यादी देतो आणि तिला सांगतो की, त्याचा बिझनेस पार्टनर रात्री जेवणासाठी येणार आहे. त्याचवेळी, मॉडर्न कॉलनीच्या पोलिस स्टेशनच्या नूतनीकरणाचे काम सुरू असते आणि आणि तिवारी कामगारांना त्याच्या घरी राहण्यासाठी जागा देतो. रात्र होते तसे तिवारीचा बिझनेस पार्टनर रात्रीच्या जेवणासाठी येतो आणि अंगूरीला त्रास देऊ लागतो. अंगूरीला खूप राग येतो आणि नकळतपणे त्याला फ्राईंग पॅन मारते, ज्यामुळे त्याचा मृत्यू होतो. तिवारी व अंगूरी घाबरून जातात आणि त्वरित त्याचे मृत शरीर लपवण्याची योजना आखतात. विभुती त्यांच्या मदतीस धावून येतो. तो अंगूरीला खोटे भांडण करून रागाने घर सोडून जाण्याचा सल्ला देतो, तसेच बॅगेमध्ये मृत व्यक्तीच्या बॉडीला घेऊन जाण्यास सांगतो. पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरतो, कारण दरोगा हप्पू सिंग व कमिशनर त्यांच्या घरी येतात, ज्यामुळे त्यांना धक्का बसतो.”