no images were found
सेटवर अशा प्रकारे रोहित सुचांती करतो ऐश्वर्या खरेची मस्करी
गेली दोन वर्षे ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ मालिकेतील लक्ष्मी (ऐश्वर्या खरे) आणि ऋषी (रोहित सुचांती) यांच्या आयुष्यातील कलाटण्यांनी आणि मन गुंतवून ठेवणार््या कथानकाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या मालिकेने स्वत:चा प्रेक्षकवर्ग तयार केला असून #RishMi हे नाव घरोघरी पोहोचले आहे. लक्ष्मी आणि आपण यातून एकीची निवड करण्याचा अखेरचा पर्याय ऋषीची आई नीलम (स्मिता बन्सल) जेव्हा ऋषीला देते, तेव्हा तो लक्ष्मीला घेऊन ओबेरॉय हाऊस कसे सोडून जातो, ते गेल्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले.
नाट्यपूर्ण आणि गंभीर प्रसंगांसाठी चित्रीकरण करताना सर्वच कलाकारांवर खूप ताण पडतो, त्यामुळे सेटवरील वातावरण हसतेखेळते ठेवण्यासाठी रोहित आपल्या गंमतीशीर खोड्यांनी सर्वांची करमणूक करीत असतो. आपल्या सर्वच कलाकारांबरोबर त्याची चेष्टामस्करी दिवसभर सुरू असते, त्यामुळे कलाकारांचे मनही हलके होते. ऐश्वर्या खरे ही त्याची खात्रीची सहकलाकार आहे, जिची मस्करी केल्यावर त्याला अगदी अपेक्षेप्रमाणेच तिची प्रतिक्रिया उमटते. तिचा मोबाईल दडवून ठेव, पटकथाच बदलून टाक किंवा तिचे अनपेक्षितपणे विचित्र पोझमध्ये फोटो व व्हिडिओ काढणे यासारख्या त्याच्या चेष्टांमुळे सेटवरील वातावरण नेहमीच हलकेफुलके राहते.