
no images were found
आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सप्ताह निमित्त विवेकानंद कॉलेज मार्फत अर्थसाक्षरतेची विवेक रॅली
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सप्ताह ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत साजरा केला जातो. आपली गुंतवणूक सावधपणे करावी तसेच फसव्या योजनांच्या मध्ये व उच्च परतावा देणाऱ्या जाहिरातीमध्ये न फसता सावधपूर्वक गुंतवणूक करावी हा संदेश देण्यासाठी विवेकांनंद महाविद्यालय कोल्हापूर च्या १२७ विद्यार्थ्यांनी विवेकाचा अर्थजागर करणारी रॅली दि. ९ ऑक्टोबर राजी काढली. यासाठी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार तेसच मराठी विभागाचे प्राध्यापक श्री. एकनाथ आळवेकर, अर्थशास्त्र विभागाचे डॉ. कैलास पाटील, डॉ. सोमनाथ काळे, प्रा. संदीप पाटील, प्रा. आण्णासो वसेकर व प्रा. अभिषेक चौगुले यांनी सहभाग घेतला.
सदर रॅली साठी सेबी(SEBI) व सीडीएसएल (CDSL) चे तज्ञ मार्गदर्शक व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्राध्यापक डॉ. विजय ककडे यांनी मार्गदर्शन केले