
no images were found
शुभांगी अत्रे बनली स्टायलिस्ट
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अंगूरी भाबी ऊर्फ शुभांगी अत्रे अद्भुत ऑनस्किन व्यक्तिमत्त्वासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्या अपवादात्मक अभिनय कौशल्यांसह प्रेक्षकांचे मन जिंकण्यासह अभिनेत्रीने नुकतेच सांगितले की, ती मालिकेमधील तिच्या भूमिकेसाठी स्वत:हून देसी, पण ग्लॅमरस आऊटफिट्सची निवड व खरेदी करते. तिची फॅशनशैली मालिकेमधील तिच्या विनोदीशैलीला साजेसी आहे. अभिनेत्रीने मालिकेमधील तिच्या कॉस्चूम्ससाठी निवडण्यासाठी घेतलेली अथक मेहनत, तसेच नुकतेच इंदौर शहराला दिलेल्या भेटीबाबत सांगितले, जेथे तिने लक्षवेधक स्टायलिश लुक दाखवले.
आपल्या फॅशन कौशल्यांबाबत सांगताना अभिनेत्री उत्साहाने शुभांगी अत्रे णाल्या, ”मालिकेमध्ये अंगूरी नेसणारी प्रत्येक साडी किंवा लेहंगा बारकाईने विचार करून निवडण्यात आले आहेत, तसेच अधिक आवडीने तयार करण्यात आले आहेत. मी बारकाईने प्रत्येक आऊटफिटची निवड किंवा डिझाइनिंग करते, जे मालिकेमधील माझ्या भूमिकेला शोभून दिसते. मला सांगताना अभिमान वाटतो की मालिकेमध्ये मी परिधान करणाऱ्या सर्व पोशाखांना स्वत:हून स्टायलिश केले आहे, ज्यामध्ये उत्तम व विविध आकर्षक कलेक्शनचा समावेश आहे. अंगूरीच्या पेहरावामध्ये स्टाइलची भर करताना मला आनंद होण्यासोबत खूप समाधान वाटते. मी अंगूरीच्या आऊटफिट्ससाठी शॉपिंग करते तेव्हा मनापासून स्वत:ला त्यामध्ये झोकून देते. तिच्या पारंपारिक अॅक्सेसरीजपासून चमकदार लेहंगे आणि फुलांच्या हेअरबँड्सपर्यंत मी प्रत्येक घटकाची बारकाईने निवड करते, जे माझ्या भूमिकेच्या लुकला साजेसे असतात. माझे लुक व मेकअपमधील परिवर्तन उल्लेखनीय आहे, अंगूरी प्रेक्षकांमध्ये, विशेषत: महिला व गृहिणींमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. मी निवडणारी ज्वेलरी आकर्षक डिझाइनची असते, ज्यामध्ये पारंपारिक व आधुनिक आकर्षकता सामावलेली असते आणि माझ्या लुकला साजेशी असते.” त्या पुढे म्हणाल्या, ”मी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नुकतेच माझे मूळगाव इंदौरला गेले होते, जेथे मी वजनाने हलके व आकर्षक पोशाख परिधान करण्यासोबत पोशाखांना शोभून दिसणारी अॅक्ससेसरी परिधान केली. पहिल्या दिवशी मी लिंबू रंगाची साडी नेसली, जी इंदौरच्या प्रकाशमय व प्रखर वातावरणामध्ये अधिक उजळून दिसत होती. सायंकाळी मी सफेद रंगाचा लेहंगा परिधान केला, ज्यावर चमकणारे मिरर वर्क होते, ज्यामधून माझा लुक अधिक आकर्षक व मोहक दिसला. फॅब्रिकवर फॉईल मिरर व डोरी वर्क होते, तर ब्लाऊज आकर्षक व चमकणारा होता. दुसऱ्या दिवशी मी पूर्ण-बाहूच्या ब्लाऊजसह गुलाबी रंगाची साडी नेसली आणि उत्सवी उत्साहाचा आनंद घेतला. लोकांना माझे स्टायलिंग प्रयत्न आवडतात व ते त्याचे कौतुक करतात हे पाहून मला आनंद होत आहे.”