no images were found
कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान कोणाला मिळाला अखेर ठरलं
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला होणारी विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ नये, ही पूजा सामान्य वारकऱ्याच्या हस्ते करावी अशी मागणी पंढरपूरातील सकल मराठा समाजाने केली आहे. मराठा आरक्षण मुद्द्यावर सुरु असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे
आजच्या बैठकीत कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता मंदिर समितीने कोणालाही पुजेचे निमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत मराठा शिष्टमंडळाची चर्चा झाली असून, यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार असल्याचं सांगण्यात आलं.
या बैठकीत मराठा समाजाने पाच मागण्या जिल्हाधिकार्यासमोर मांडल्या होत्या. त्या सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याने मराठा समाजाने शासकीय महापूजेला केलेला विरोध माघारी घेतला असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून दिली आहे.