Home राजकीय कार्यकर्त्यांवरील विनयभंगाच्या गुन्ह्यांवरून संजय राऊतांनी देवेद्र फडणवीसांवर टीकास्त्र

कार्यकर्त्यांवरील विनयभंगाच्या गुन्ह्यांवरून संजय राऊतांनी देवेद्र फडणवीसांवर टीकास्त्र

4 second read
0
0
25

no images were found

कार्यकर्त्यांवरील विनयभंगाच्या गुन्ह्यांवरून संजय राऊतांनी देवेद्र फडणवीसांवर टीकास्त्र

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिंदे आणि ठाकरे गट यांच्यात मोठा राडा झाला. झालेल्या राड्यावरून पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हेही दाखल केलेत. यावरून संजय राऊतांनी देवेद्र फडणवीस टीकास्त्र सोडलंय.

 तुम्ही कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करता, ही विकृती आहे. गृहमंत्र्यांनी या विकृतीवर तोडगा काढला नाही तर पुढे काय करायचं ते आम्ही बघून घेऊ, असा इशारा देखील संजय राऊत देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

गद्दारांना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर रोखण्याचा नक्कीच प्रयत्न झाला. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर विनयभंगाचे खटले दाखल केले. असं केल्याने तुम्ही या सरकारची विकृती दाखवून दिली आहे. ही विकृती महाराष्ट्राला बदनाम करतेय, अशा शब्दांत राऊतांनी आगपाखड केलीये.

दाखल गुन्ह्यांवरून पुढे त्यांनी म्हटलं की, तुम्ही आमच्यावर कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी आमचा संघर्ष सुरूच राहिल. संघर्ष न्यायालयात तर आहेच आणि रस्त्यावर सुद्धा सुरूच राहिल. विनयभंगाचे गुन्हे दाखल केले तेव्हा ज्या महिला तेथे होत्या त्यांची भाषा आणि वर्तन काय होते ते तुम्ही तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहा. हे कायद्याचं राज्य आहे आणि यात एकतर्फी कारवाई करणे यालाच विकृती म्हणतात, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…