
no images were found
उत्कटतेचा, स्वत:वरील विश्वासाचा आणि स्वप्नांच्या पाठलागाचा प्रवास- बघा अॅमेझॉन मिनीटीव्हीवर स्ट्रीम होणारी मालिका ‘स्लम गोल्फ’!
मुंबई : अॅमेझॉन मिनीटीव्ही ही अॅमेझॉनची मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा वैविध्यपूर्ण कॉण्टेण्ट लायब्ररी देऊ करत आहे. ह्यामध्ये नाट्यपूर्ण, थरारक, साय-फाय, विनोदी आणि साहसपर कॉण्टेण्टचा समावेश होतो. अॅमेझॉन मिनीटीव्हीवर नुकतीच आलेली स्लम गोल्फ ही मालिकाही इच्छा व आशावादाच्या जोरावर दु:ख व आयुष्यातील खडतर परिस्थितीवर मिळवलेल्या विजयाची कथा सांगते. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या आठ भागांच्या क्रीडानाट्यात, मुंबईच्या झोपडपट्टीतून गोल्फ क्षेत्रातील वैभवापर्यंत पोहोचलेल्या पवन नागरेचा प्रवास, उलगडला आहे.
शौर्य, तग धरून राहण्याची जिद्द आणि अखेरीस मिळालेला विजय ह्यांच्या कथा लोकांना नेहमीच प्रेरणादायी वाटतात. ह्या कथा प्रेक्षकांना स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आशा व धैर्य देतात आणि दु:ख सहन करण्यासाठी प्रोत्साहन देतात. झोपडपट्टीतून गोल्फ कोर्सपर्यंत पोहोचलेल्या एका व्यक्तीच्या प्रेरणादायी कथेतून ह्या मालिकेने पवन नागरेचा प्रवास कथन केला आहे. प्रेक्षकांना सतत मोठी स्वप्ने बघण्याचे आवाहन करणारी ही प्रेरणादायी कथा आहे. कॅडी म्हणजेच गोल्फ कोर्सवर सामान वाहणारी मुले गोल्फर्स झाल्याच्या अनेक सत्य घटनांपासून ही मालिका प्रेरित आहे. विशेषत: ‘स्लम गोल्फ’ लोकप्रिय करण्यासाठी ओळखले जाणारे बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लबचे अनिल माने ह्यांच्यापासून ही मालिका प्रेरित आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लबपासून एका रस्त्याच्या अंतरावर असलेल्या न्यू भारत नगरमधील झोपडपट्टीत पवन नागरे वाढला. वयाच्या 10व्या वर्षी वाकलेल्या लोखंडी सळ्या आणि पिंग-पाँग बॉल्स घेऊन त्याने झोपडपट्टीतील चिंचोळ्या गल्ल्यांचे गोल्फ कोर्स केले. हा खेळ स्वत:च्या पद्धतीने खेळत त्याने ‘स्लम गोल्फ’ आकाराला आणले. तो 18 वर्षांचा झाल्यापासूनचा प्रवास ह्या मालिकेत दाखवला आहे. 60 फुटी रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर कमी असले तरी प्रवास मोठा आहे. आयुष्य अनेकदा आव्हानात्मक होऊ शकते, तुम्हाला हव्या त्या पद्धतीने गोष्टी घडत नाहीत; मात्र आणि आपल्या महत्त्वाकांक्षांचा त्याग कधीही करू नये, कारण, परिश्रमांचे फळ नेहमी मिळतेच हे पवन नागरेच्या प्रवासातून लक्षात येते.
ही टेम्पल बेल्स फिल्म्सद्वारे निर्मित व सुजय डहाके दिग्दर्शित मालिका केवळ 22 नोव्हेंबर 2023पासून केवळ अॅमेझॉन मिनीटिव्हीवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. तुम्ही अॅमेझॉन मिनीटीव्ही प्लेस्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा अॅमेझॉन शॉपिंग अॅप किंवा फायर टीव्हीद्वारे ही मालिका बघू शकता.