
no images were found
खासदार चषक अखिल भारतीय खुल्या भव्य बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर(प्रतिनिधी) :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने आणि अनयाज् चेस क्लब ने शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील भव्य अश्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात आयोजित केलेल्या अखिल भारतीय खुल्या भव्य खासदार चषक जलद बुद्धिबळ मोठ्या दिमाखात आज संपन्न झाल्या.खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून खासदार महोत्सव क्रीडा कुंभमेळाव्या अंतर्गत या बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या.
स्विस् लीग पद्धतीने झालेल्या स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे ने नऊ पैकी साडेआठ गुण मिळवून अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद पटकाविले.त्याला रोख पंधरा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. सातवा मानांकित मिरजेच्या मुद्दसर पटेल ने आठ गुणांसह उपविजेतेपदाला गवसणी घातली त्याला रोख बारा हजार रुपये व चषक देऊन गौरविले.आठवा मानांकित पुण्याच्या नमित चव्हाण ने आठ गुणांसह तृतीय स्थानवर मुसंडी मारली त्याला रोख आठ हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.खुल्या गटात रोख 25 बक्षिसे व विविध वयोगटात 75 उत्तेजनार्थ बक्षीसे अश्या एकूण 100 बक्षीसांचे वितरण केले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ अमित पालोजी, एडवोकेट मंदार पाटील,अध्यक्ष युवा सेना कोल्हापूर शहर,सुधीर राणे, रोहित पवार, शिवप्रसाद घोडके व सागर डबलं यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर मुख्य पंच व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मनीष मारुलकर उमेश पाटील,उत्कर्ष लोमटे,आरती मोदी व दीपक वायचळ उपस्थित होते.सूर्याजी भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.धनंजय महाडिक युवाशक्ती चे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक व वैष्णवी महाडिक या उभयतांनी स्पर्धा स्थळी भेट देऊन खेळाडूंचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी करण परीट, दीपक वायचळ, आरती मोदी, सूर्याजी भोसले, जयश्री पाटील, सचिन भाट,किरण शिंदे,अभिजीत चव्हाण, विजय सलगर, शितल भाट, नयन पाटील या सर्वांनी पंच व संयोजक म्हणून अथक परिश्रम घेतले.
वारणानगर