
no images were found
पुरोगामी आणि नक्षलवादी यांचा खरा चेहरा उघड करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला ‘सनातन धर्मरक्षक’ बनावे लागेल – श्री. सुनील घनवट
कोल्हापूर – सनातन धर्माविषयी ‘हेट स्पीच’द्वारे गरळ ओकणारे साम्यवादी उदयनिधी स्टॅलीन, प्रियांक खर्गे, जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात सरकारने गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. यापुढील काळात नक्षलवादी, हिंदु धर्मद्वेष्टे यांना कायदेशीर मार्गाने विरोध केल्याविना सनातन धर्म रक्षक शांत बसणार नाहीत आणि हिंदु धर्म विरोधकांच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला ‘सनातन धर्मरक्षक’ बनावे लागेल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या प्रसंगी इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, लकी बझार, राजारामपुरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत हाते.
श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘ सनातन हिंदु धर्म हा एकमेव प्राचीन धर्म आहे. हिंदु धर्मियांनी कधीही ना कोणावर आक्रमण केले, ना कोणाच्या हत्या केल्या. सनातन धर्म नष्ट करून धर्मद्वेष्ट्यांना आपली प्राचीन संस्कृती, परंपरा नष्ट करायची आहे. त्यांचे कुटील कारस्थान ओळखून समस्त हिंदूंनी सतर्क होऊन संघटितपणे या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणारे कन्हैया कुमार, उमर खालिद, अफजल गुरु यांसारख्या आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ गळे काढणारे साम्यवादी हिंदु धर्मावर शिंतोडे उडवणारे अर्बन नक्षलवादी हेच सनातन धर्माचे खरे शत्रू आहेत. मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतांना ‘मी सर्व धर्मांशी समान वागेन’, अशी प्रतिज्ञा घेतलेली असते; मग ते सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया असे कसे म्हणू शकतात ? त्यामुळे प्रत्येक हिंदूने सजग होऊन धर्मद्वेष्ट्यांची ही आक्रमणे कायदेशीर मार्गाने हाणून पाडावीत.’’
या प्रसंगी सनातन संस्थेचे संत पू. सदाशिव परब, उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक, श्री. पराग फडणीस, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे, श्री. रामभाऊ मेथे, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन वाडेकर यांसह ३५० हून जिज्ञासू, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांनी ‘मी सनातन धर्मरक्षक’ म्हणून कार्य करण्यासाठी सिद्ध असल्याचे दोन्ही हात वर करून अनुमोदन दिले. कार्यक्रमानंतर धर्मप्रेमींसमवेत झालेल्या चर्चेत 4 नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी 6 वाजता ‘हेट स्पीच देणार्यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निश्चय करण्यात आला.