no images were found
कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग ठरला
कोल्हापूर : कोल्हापूरकर कोरोनाच्या संकटानंतर 2 वर्षांनी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करत आहेत. उत्सव साजरा करत असताना कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग कोणता असावा, यावर नुकतीच पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांची बैठक पार पडली. यामध्ये अखेर कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग ठरला तो पुढीलप्रमाणे-
गणेश विसर्जनासाठी दोन पर्यायी मार्ग – १) पर्यायी मार्ग – सावित्रीबाई फुले हॉस्पिटल – हॉकी स्टेडियम – संभाजीनगर ते क्रशर चौक
२) पर्यायी मार्ग – उमा टॉकीज – बिंदू चौक – शिवाजी चौक – पापाची तिकटी- गंगावेश- रंकाळा स्टँड- रंकाळा टॉवर ते इराणी खण.
तसेच पारंपरिक महाद्वार रोडवरुन जाणारा मार्ग गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी खुला राहील, असंही बैठकीत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण शहर वाहतुक पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी, शहरातील सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्यासह आर के पोवार, बाबा पार्टे, रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक अनिल कदम, सुजित चव्हाण, मनसेचे राजू जाधव, बंडा साळोखे यांच्यासह शहरातील सर्व तालीम मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.