
no images were found
लव्ह जिहादवरुन खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये खडाजंगी
अमरावती: धारणी येथील एका मुलीच्या लव्ह जिहाद प्रकरणावरून येथील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये खासदार नवनित राणा आणि पोलिसांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. एका हिंदू 19 वर्षे युवतीचे काल अपहरण केले, मुलीने केलेल्या चॅटिंग वरून पोलिसांनी सोहेल शहा या संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात आणले. मात्र अजूनही मुलीचा शोध न लागल्याने भारतीय जनता पक्ष विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते व अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या. यावेळी नवनित राणा आणि पोलिसांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.
आरोपींनी मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप यावेळी नवनीत राणा व इतर कार्यकर्त्यांनी केला. मात्र यावेळी नवनीत राणा यांनी पोलिसांना कॉल केला असता त्यांनी माझा कॉल रेकॉर्ड का केला यावरून नवनीत राणा व पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला.
कॉल रेकॉर्ड करण्याचे अधिकार तुम्हाला दिले कोणी? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तरुणीला पतीनं डांबून ठेवल्याचा आरोप राणा यांनी यावेळी केला. मुलीला समोर आणा अशी राणा यांनी मागणी केली आहे. २ तासांत मुलीचा शोध लावा. असा अल्टिमेट राणा यांनी पोलिसांना यावेळी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी लव्ह जिहाद संदर्भात गंभीर दखल घेत ज्या मुली लव्ह जिहादच्या कचाट्यात सापडल्या आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आणि कुटुंबीयांना मदत करण्याचं काम सुरू केले. येणाऱ्या काळात या विरोधात आम्ही मोठी मोहीम उभारणार आहोत, असं स्पष्ट संकेत दिले आहेत.
जिल्ह्यातील धारणी येथील उच्चशिक्षित मुलीला पळवून नेल्यात आलं. विशिष्ट जातीच्या व्यक्तीनं फसवणूक केली. तो व्यक्ती रुग्णवाहिकेवर चालक आहे. मुलीला अमरावती येथे आणत बळजबरीने विवाह करण्यात आला होता. असा धक्कादायक आरोप भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केला होता. बोंडे म्हणाले, चंद्रविला धर्मदाय संस्थेला लग्न लावून देण्याचा अधिकार नाही. त्यांनी बनावट कागदपत्राचे आधारे हे लग्न लावून दिले. तो मुस्लिम काजी नसून एका मजुराची काजी म्हणून स्वाक्षरी घेण्यात आली असल्याचे पोलीस तपासात पुढे आलं. त्यामुळं चंद्रविला संस्थेविरुद्ध अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.