
no images were found
प्रसिद्ध अभिनेता स्टीफन बॉसची हॉटेलमध्ये आत्महत्या
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता, डान्सर, डीजे, स्टीफन बॉसने जगाचा निरोप घेतला आहे. स्टीफन बॉसने वयाच्या ४० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्टीफन बॉसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्टीफन बॉसच्या घरच्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
लॉस एंजेलिसमधील हॉटेलच्या खोलीत पोलिसांना बॉसचा मृतदेह सापडला. दुसरीकडे, स्टीफन बॉसची पत्नी एलेन हॉकर म्हणते की बॉस त्याची कार न घेता घरातून निघून गेला, ही एक विचित्र गोष्ट होती, कारण बॉस कधीही त्याच्या कारशिवाय कुठेही जा नाहीत. स्टीफन बॉसच्या अचानक जाण्यामुळे सगळेच धक्क्यात आहेत. चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यामातून दुःख व्यक्त करत आहेत. स्टीफन ने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचेही वृत्तात सांगितलं जात आहे. मात्र, त्यानं आत्महत्येसारखं मोठं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्याच्या मृत्यूची बातमी त्याची पत्नी एलेन हॉकरने दिली आहे.