Home क्राईम प्रेमाच्या  त्रिकोणातून पोलीस  ठाण्यात गोळीबार; पाच पोलिस निलंबित

प्रेमाच्या  त्रिकोणातून पोलीस  ठाण्यात गोळीबार; पाच पोलिस निलंबित

0 second read
0
0
39

no images were found

प्रेमाच्या  त्रिकोणातून पोलीस  ठाण्यात गोळीबार; पाच पोलिस निलंबित

बागपत : महिला सहकाऱ्यासोबतच्या प्रेमसंबंधावरून दोन कॉन्स्टेबलमध्ये जोरदार वाद झाल्यामुळं पोलिस ठाण्यात गोळीबार करण्यात आला या प्रकरणी  कॉन्स्टेबल योगेश चहल, एसएचओ यांच्यासह पाच पोलिसांना निलंबित केलंय.

बहेरी पोलिस स्टेशनमधील दोन कॉन्स्टेबल, ज्यांचं वय 20 इतकं आहे. त्यांचं एकाच महिला सहकाऱ्यावर प्रेम जडलं होतं. दोघांनाही एकाच महिलेसोबत अफेअर असल्याची माहिती मिळाल्यावर, दोघांमध्ये जोरदार वाद झाला. मोनू कुमारनं सर्व्हिस रिव्हॉल्व्हर उचलून पोलिस ठाण्याच्या आत गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही.

मोनू कुमार हा पश्चिम उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील असून डिसेंबर 2019 मध्ये बहेरी पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहे. याच पोलीस ठाण्यात या वर्षी जानेवारी महिन्यात त्याच्या शेजारच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका महिला कॉन्स्टेबलची भरती झालीय. मोनू कुमार आणि लेडी कॉन्स्टेबल एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. बहेरी स्टेशनवर तैनात होण्यापूर्वी ते गेल्या एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते.

दुसरा हवालदार योगेश चहल यालाही लेडी कॉन्स्टेबल खूप आवडायची. त्यानं मोनू आणि महिलेच्या नात्याबद्दल अश्लील टिप्पणी केली. त्यामुळं वाद उफाळला. या प्रकरणात सामिल असलेल्या पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलिस स्टेशनचे प्रभारी मनोज कुमार यांचाही समावेश आहे. याबाबत अंतर्गत चौकशीचे आदेशही दिलेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…