Home शासकीय लिशा हॉटेल परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

लिशा हॉटेल परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

18 second read
0
0
34

no images were found

लिशा हॉटेल परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

कोल्हापूर (प्रतिनिधी): महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.4 छ.ताराराणी मार्केट व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज लिशा हॉटेल चौक ते डॉ.डी.वाय पाटील हॉस्पीटल या परिसरात कारवाई करण्यात आली. या कारवाईत 3 हातगाडया, 22 डिजीटल बोर्ड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तर काही मालकांनी स्वता:हून आपल्या हातगाड्या काढून घेतल्या.  

            मा.उच्च न्यायालय, मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर यांचेकडे दाखल असले कोल्हापूर शहरातील रस्त्याचा दर्जा, अतिक्रमण बाबत जनहित याचिका क्रमांक 91/2025 दि.22 जानेवारी 2026 रोजीचे आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागामार्फत हि कारवाई करण्यात आली.

            सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपशहर अभियंता निवास पोवार, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, अधीक्षक विलास साळोखे, सहा.अधिक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, मुकादम व अतिक्रमण कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्र :’राज्यशास्त्रातील नवीन प्रवाह’ यावर होणार विचार मंथन

शिवाजी विद्यापीठात १३ व १४ मार्च रोजी राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि राष्ट्रीय चर…