आर्ट ऑफ लिव्हिंग चे शारदीय नवरात्र निमित्ताने आयोजित श्री. महा चंडी होम संपन्न..
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) :श्री. महा चंडी होमाच्या निमित्ताने 108 कन्या पूजन, सुहासिनी पूजन, दांपत्य पूजन सह गो पूजन आणि अश्व पूजन झाले. आयर्विन मल्टी परपज हॉल येथे हजारो साधक आणि भाविकांच्या उपस्थितीत स्वामी अद्वैतानंद यांच्या पावन हस्ते आणि पंडित कौशिक जी यांच्या मार्गदर्शनाखाली हे होम झाले.
या होमाचे कलश स्थापना आणि देवी भागवत चे पारायण आदल्या दिवशी केले गेले. आज वनौषधी आणि विविध हवनाच्या द्वारे पूर्णाहुती देऊन सांगता झाली.
सत्संग आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
या तीन दिवसीय विविध होम आणि विधी साठी राजश्री भोसले पाटील, सचिन पाटील, वैशाली शेडे, अजय किल्लेदार, बिना जनवाडकर, विनायक मुरदंडे,प्रविण देशमुख, जगदीश कुडाळकर, अनिमा दहीभाते,अजिंक्य पाडगावकर, निखिल अग्रवाल, जगदीश सोमैया, मंदिर चव्हाण, इत्यादी प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
यामध्ये सांगली, इचलकरंजी, वारणा, कोडोली, हुपरी, पेठ वडगाव सह जिल्ह्यातील विविध भागातील साधक उपस्थित होते.