
no images were found
माने महाराजांच्या समाधीचे व्हन्नूर येथे मंगळवारी भूमिपूजन
कागल – येथील श्री समर्थ सदगुरू दत्त माने महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धारानिमित्त येत्या मंगळवारी सकाळी नऊ वाजता भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. स्वामी आनंदगिरी महाराज, आसुर्ले पोर्ले यांच्या हस्ते, स्वामी सच्चिदानंद महाराज, तमनाकवाडा यांच्या छत्र छायेखाली आणि संत हेरवारकर मामा, संत बाळू मामा मंदिर, रुकडी यांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र व्हन्नूर येथे भूमिपूजन कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही श्री समर्थ सदगुरू दत्त माने महाराज भक्त मंडळ ट्रस्ट, व्हन्नूर, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरच्या वतीने केले आहे.