no images were found
नेस्ले इंडियाने एका तिमाहीमध्ये ५,००० कोटी रूपयांचा महसूल पार करण्याचा टप्पा गाठला दोन–अंकी देशांतर्गत विक्री वाढ कायम
मुंबई : नेस्ले इंडियाच्या संचालक मंडळाने आज २०२३च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांना मान्यता दिली. या निकालांबाबत आपले मत व्यक्त करत नेस्ले इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. सुरेश नारायणन म्हणाले, ”मला सांगताना आनंद होत आहे की, आम्ही पुन्हा एकदा सर्व प्रमुख ब्रॅण्ड्समध्ये सातत्यपूर्ण कामगिरीची नोंद केली. मिक्स, व्हॉल्युम व प्राइसमुळे देशांतर्गत विक्रीमध्ये दोन–अंकी वाढ झाली. प्रमुख ब्रॅण्ड्सनी उत्तम कामगिरी करणे सुरूच ठेवले, ज्यामध्ये किटकॅट, नेसकॅफे क्लासिक, नेसकॅफे सनराइज अग्रस्थानी होते, ज्यांना मंच व मिल्कमेडचे पाठबळ मिळाले. आम्ही आमची ब्रॅण्ड इक्विटी निर्माण करण्याप्रती गुंतवणूक करत आहोत आणि सर्व उत्पादन समूहांमध्ये प्रबळ व मोठ्या प्रमाणत गुंतवणूका केल्या आहेत. आम्ही ५,००० कोटी रूपयांचा महसूल पार केला, जे कंपनीच्या इतिहासामध्ये कोणत्याही तिमाहीत पहिल्यांदाच घडले आणि आमच्यासाठी मोठा टप्पा ठरला.