no images were found
महायुतीच्या घटकपक्षाचा प्रमुख शरद पवारांच्या भेटीला!
मुंबई :आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना राज्यात होणार आहे. महायुतीसोबत असलेला एक पक्ष महाविकास आघाडीसोबत येण्याची शक्यता आहे. दोन बड्या नेत्यांमधील भेटीमुळे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुतीसोबत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी ही भेट झाल्याचं समोर येत आहे.