Home मनोरंजन बॉलिवूड सोडून साध्वी का बनली अभिनेत्री?

बॉलिवूड सोडून साध्वी का बनली अभिनेत्री?

2 second read
0
0
27

no images were found

बॉलिवूड सोडून साध्वी का बनली अभिनेत्री?

बॉलिवूडमध्ये अशा अनेक नायिका होऊन गेल्या आहेत, ज्यांनी एकेकाळी मोठ्या पडद्यावर राज्य केले. मात्र काही अशाही आहेत ज्यांनी अभिनय सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला, तर काही साध्वी झाल्या. त्या नायिकांनी घेतलेल्या या अचानक निर्णयाने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. अभिनेते विनोद खन्नाही चित्रपटसृष्टी सोडून संन्यासी बनले होते, नंतर ते सिनेविश्वात परतले. मात्र काही नायिका परत येऊ शकल्या नाहीत आणि सर्व ऐहिक सुख, आसक्ती आणि संसाराचा त्याग करून साध्वी झाल्या. ही लोकप्रिय अभिनेत्रीही अशाच अभिनेत्रींप्रमाणे होती, जी ७०-८० च्या दशकात बॉलिवूडमध्ये सुपरहिट होती. मात्र नंतर या अभिनेत्रीने साध्वी होण्याचा निर्णय घेतला. या अभिनेत्रीचं नाव आहे नीता मेहता. नीता यांचे एकेकाळी संजीव कुमार यांच्याशी लग्न होईल अशीही चर्चा होती.
नीता मेहता यांचा जन्म १९५६ मध्ये एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांचे वडील वकील होते, तर आई डॉक्टर होती. कुटुंबात ना चित्रपटाचे वातावरण होते ना कोणाला या जगात येण्याची इच्छा होती. पण नीता यांचे स्वप्न फक्त हिरॉइन होण्याचेच होते. नीता यांना अभ्यासात अजिबात रस नव्हता. नायिका बनण्यासाठी त्या कुटुंबाच्या विरोधातही गेल्या होत्या. नीता मेहता यांनी मुंबईत शालेय शिक्षण केले तर त्यानंतर त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. याठिकाणी दोन वर्षांचा कोर्स केल्यानंतर नीता यांना चित्रपटांमध्ये सहज ब्रेक मिळाला.
१९७५ मध्ये आलेला ‘पोंगा पंडित’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात नीता यांच्या सोबत रणधीर कपूर होते. यानंतर नीता यांनी ‘ईंट का जवाब पत्थर’, ‘मंगल पांडे’, ‘ये है जिंदगी’, ‘आखरी इंसाफ’, ‘कामचोर’, ‘रिश्ता कागज का’, ‘जानी दुश्मन’, ‘हिरो’ आणि ‘ सलतनत’सह अनेक चित्रपट केले. त्या काळातील एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून नीता यांनी ओळख निर्माण केली होती.
नीता यांनी विनोद खन्ना यांच्यापासून राजेश खन्ना, धर्मेंद्र आणि संजीव कुमारपर्यंत सर्वांसोबत काम केले. नीता आणि संजीव यांनी चार-पाच चित्रपट एकत्र केले होते. एकत्र काम करत असताना ते दोघे प्रेमात पडले. दोघांनाही लग्न करायचे होते, पण संजीव यांच्या एका अटीमुळे सारं काही बिघडलं. नीता यांनी चित्रपटात लग्नानंतर काम करू नये, अशी संजीव कुमार यांची इच्छा होती, असे म्हटले जाते. नीता यांनी अभिनेत्याची ही अट मान्य केली नाही.
चित्रपटात येण्यासाठी कुटुंबाविरुद्ध बंड करणाऱ्या नीता संजीव यांची अट मानणं शक्यच नव्हतं. नीता यांनी नकार दिल्यानंतर त्यांचे लग्न झाले नाही आणि नीता यांनी आपल्या करिअरकडे लक्ष वळवले. मात्र कालांतराने त्यांना मुख्य भूमिका मिळणे बंद झाले होते. ही घटना ८० च्या दशकातील आहे. त्यानंतर त्यांनी सहाय्यक भूमिका साकारण्यास सुरुवात केली. काही चित्रपटांमध्ये नीता मोठ्या बहिणीच्या भूमिकेत तर काही चित्रपटांमध्ये त्या नायिक-नायकाच्या वहिनीच्या भूमिकेत दिसत होत्या. नीता यांनी जवळपास ४० चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. यामध्ये ‘हमसे बढकर कौन’, ‘नौकर बीवी का’ आणि ‘स्वर्ग से सुंदर’ या चित्रपटांचा समावेश आहे. नंतर एक वेळ अशी आली की नीता यांना या भूमिकाही मिळत नव्हत्या. त्यानंतर त्यांनी सिनेसृष्टी सोडली आणि दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला.
​दागिन्यांचा व्यवसाय आणि नंतर बनल्या साध्वी​
नीता यांचा दागिन्यांचा व्यवसाय चांगला चालला होता. त्यांनी काही वर्षे यात गुंतवली आणि चांगली कमाई केली होती. पण अचानक नीता यांना वाटू लागले की, चित्रपट किंवा व्यवसाय हा त्यांच्या आयुष्याचा उद्देश नाही. त्यांना काहीतरी वेगळे शोधायचे आहे. त्यानंतर त्या सर्वकाही सोडून संन्यासी बनल्या. एवढेच नाही तर त्यांनी नावही बदलले. आता त्या स्वामी नित्यानंद गिरी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे एक YouTube चॅनल आहे, ज्याद्वारे त्या त्यांचे अनुभव शेअर करतात.
नीता मेहता यांची स्वामी नित्यानंद गिरी कशी झाले, हेही त्यांनी सांगितले आहे. नीता यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की त्या गुरु माँ आनंदमयी यांच्यामुळे साध्वी बनल्या आणि त्यांच्या जीवनावर एक पुस्तकही लिहिले आहे. नीता यांच्या म्हणण्यानुसार त्यांना साध्वी बनण्यासाठी ३–४० वर्षे लागली. त्या नेहमीच गुरु माँ आनंदमयी यांच्याशी जोडलेल्या होत्या. नीता यांचे कुटुंबही गुरु माँ आनंदमयी यांचे अनुयायी होते. त्या लहानपणापासूनच या आश्रमात जायच्या. शिवाय आता त्या फक्त सात्विक अन्नाचेच सेवन करतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…