no images were found
ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन
मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. त्या गेल्या ४५ वर्षांपासून अभिनय व्यवसायात कार्यरत होत्या. त्यांनी विविध नाटकं आणि टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. रिपोर्ट्सनुसार, भैरवी गेल्या ६ महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. या दरम्यानच त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
भैरवी यांनी विविध गुजराती आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. अलीकडेच त्या निमा डेन्झोंगपा या मालिकेत काम करत होत्या. शिवाय त्यांच्या ‘हसरते’ आणि ‘महिसागर’सारख्या मालिकांचे विशेष कौतुक झाले. दरम्यान अभिनेते बाबुल भावसार यांनी त्यांच्या जुन्या मैत्रिणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना एका न्यूज पोर्टलला अशी प्रतिक्रिया दिली की, ‘मी एक नाटक केलं होतं वर्षापूर्वी. ती स्वभावाने खूपच विनम्र होती आणि ती तशीच पात्रही साकारायची.’
निमा डेन्झोंगपा या मालिकेतील कलाकारांनाही भैरवी यांच्या निधनाबद्दल खूप दुःख झाले आहे. भैरवीच्या सिनेमातील कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी ‘ताल’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तिने जानकीची भूमिका साकारली होती आणि या तिच्या भूमिकेसाठी खूप कौतुकही झालेले. भैरवीने सलमान खानच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली होती. बॉलिवूडव्यतिरिक्त त्या एक प्रसिद्ध थिएटर आणि गुजराती अभिनेत्री आहेत. त्यांनी विविध नाटके आणि गुजराती सिनेमे केले आहेत.
भैरवी यांच्या निधनानंतर ‘स्कॅम १९९२’ फेम अभिनेता प्रतिक गांधीनेही दु:ख व्यक्त केले. त्याने भैरवी यांच्यासोबत ‘व्हेंटिलेटर’ सिनेमात काम केले होते. प्रतिक म्हणाला की, ‘मला त्यांच्यासोबत ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आमच्यात खरोखर चांगले बाँडिंग होते. त्या खूप प्रेमळ होत्या. लहानपणी त्यांना स्टेजवर आणि टेलिव्हिजनमध्ये परफॉर्म करताना पाहिलेलेआणि त्यांच्या अभिनयाची नेहमीच प्रशंसा केली होती. त्यांचा हसरा चेहरा मी विसरू शकत नाही.’