
no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल‘मध्ये दामिनीच्या मदतीने पुष्पा तिचे घर परत मिळवेल का?
प्रेक्षकांना अनेक नाट्यमय ट्विस्ट्ससह टेलिव्हिजनवर स्क्रिनवर खिळवून ठेवणारी सोनी सबवरील मालिका ‘पुष्पा इम्पॉसिबल’ पुष्पा पटेल सामना करणा-या अनेक आव्हानांना दाखवते. बपुद्रा पुष्पा व तिच्या कुटुंबाला सध्या त्यांच्या घरातून बेकायदेशीरपणे बेदखल करत असताना पुष्पाने दामिनी मुलीला केलेल्या दयाळूपणाच्या कृत्याची परतफेड तिला मिळते की नाही हे आपल्याला पाहायला मिळणार आहे.