Home मनोरंजन दिल दोस्ती आणि दिवानगी

दिल दोस्ती आणि दिवानगी

32 second read
0
0
37

no images were found

दिल दोस्ती आणि दिवानगी

नवे मित्र मैत्रिणी, नव्या ओळखी, मजामस्ती, उत्साह आणि उन्माद म्हणजे कॉलेजलाईफ. ‘दिल दोस्ती दिवानगी’ सगळं तिथं अनुभवायला मिळतं. ही सगळी धमाल आपल्याला ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटातून येत्या १३ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत पहायला मिळणार आहे. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

मैत्रीच्या नात्याचा वेध आणि प्रेमाच्या नात्यातील गुंतागुंत दाखवणारा हा चित्रपट आहे. काही अनपेक्षित घटनांमुळे बदलत जाणारे नात्याचे रंग आणि प्रेमाचा प्रवास कोणत्या वळणांनी  घडत जातो याची रंजक कथा ‘ दिल दोस्ती दिवानगी’  हा चित्रपट उलगडतो.  कश्यप परुळेकर, वीणा जगताप, चिराग पाटील, स्मिता गोंदकर,  अतुल कवठळकर,  तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग या नव्या दमाच्या तरुण कलाकारांची फळी यात पहायला मिळतेय. सोबत प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर, विद्याधर जोशी,  सुरेखा कुडची यांसारख्या अनुभवी आणि मात्तब्बर कलाकारांची साथ त्यांना मिळाली आहे.  वेगवेगळ्या जॉंनरची तीन गाणी ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटात आहेत.  अवधूत गुप्ते,  वैशाली सामंत,सोनाली पटेल यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली उदय यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे.

‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचा,इ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत.  नृत्यदि

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…