
no images were found
तेरा वर्षाखालील मुलामुलींची कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा शनिवार दि.14 ऑक्टोबरला कोल्हापूरात
कोल्हापूर (प्रतिनिधी ) :- भालचंद्र चिकोडे ग्रंथालय च्या सहकार्याने व चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने शनिवार दि.14 ऑक्टोंबर 2023 रोजी तेरा वर्षाखालील मुला मुलींची जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार भालचंद्र चिकोडे ग्रंथालय,जरगनगर कोल्हापूर येथे होणार आहेत.शनिवारी दुपारी बारा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. या स्पर्धेमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील 1/1/2010 ला किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलामुलींना भाग घेता येईल.
या निवड स्पर्धेतून दोन मुले व चार मुलींची निवड 20 ते 22 ऑक्टोबर 2023 दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे़.
दोन्ही गटातील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे रु.500/-, रु. 300/- व रु.200/- रुपये रोख बक्षीस व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.
त्याशिवाय निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये व स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येकी 1 टी शर्ट बुद्धिबळ संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त रुपये 200/- प्रवेश शुल्क ठेवले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी आपली नावे शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर ला रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह खालील व्यक्तीकडे नोंदवावीत.
1) भरत चौगुले – 7620067251.
2) मनीष मारुलकर -9922965173
3) उत्कर्ष लोमटे – 9923058149
4) प्रितम घोडके – 8208650388
5) रोहित पोळ – 9657333926