Home स्पोर्ट्स राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न ,डी वाय पाटील ग्रुपकडून पाच लाखांची मदत; स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाला बळ

राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न ,डी वाय पाटील ग्रुपकडून पाच लाखांची मदत; स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाला बळ

11 second read
0
0
269

no images were found

राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न ,डी वाय पाटील ग्रुपकडून पाच लाखांची मदत; स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाला बळ

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):– व्ही पावर इंटरनॅशनल पावर लिफ्टिंग अकॅडमी, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २० मे २०२५ रोजी शिवाजी विद्यापीठातील श्री राजमाता जिजाऊ कन्व्होकेशन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. ही स्पर्धा पाच दिवस चालणार असून २५ मे रोजी सांगता समारंभ होणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी डी. वाय. पाटील ग्रुपकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. यामुळे स्पर्धेच्या भव्य आणि यशस्वी आयोजनाला मोठे बळ मिळाले आहे.

      या बाबत डी वाय पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार श्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी सांगितले की, “क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांना पाठिंबा देणे ही सामाजिक बांधिलकी आहे. खेळांमुळे युवकांमध्ये केवळ शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच तर मानसिक ताकदही विकसित होते. आम्ही दिलेली मदत ही फक्त क्रीडा संस्कृती बळकट करण्याचा एक सकारात्मक प्रयत्न आहे.”

     स्पर्धेचे आयोजक, व्ही पावर इंटरनॅशनल पावर लिफ्टिंग अकॅडमी यांनी डी वाय पाटील ग्रुपच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

    यावेळी डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने, डॉ. एस. व्ही. बनसोडे, श्री विजय शिंदे, श्री मनीष रणभिसे, श्री सिद्धार्थ बंसल, श्री अनिल मुळीक व इतर मान्यवर ,स्पर्धक उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत …