Home सामाजिक कॅम्पस ने चार नाविन्यपूर्ण फुटवेअर सोल्यूशन्सची श्रेणी केली सादर

कॅम्पस ने चार नाविन्यपूर्ण फुटवेअर सोल्यूशन्सची श्रेणी केली सादर

0 second read
0
0
41

no images were found

कॅम्पस ने चार नाविन्यपूर्ण फुटवेअर सोल्यूशन्सची श्रेणी केली सादर

कोल्हापूर : भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स आणि एथलेजर फूटवेयर ब्रँड्सपैकी एक, कॅम्पस ऍक्टिव्हवेयर लिमिटेडने कोल्हापुरात अरिहंत सेल्स एजन्सीजचे श्री. रियाझ शेख यांच्या सहयोगाने वार्षिक रिटेलर्स मीटचे आयोजन केले होते. कॅम्पस ऍक्टिव्हवेयरचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आणि शहरभरातील २५० पेक्षा जास्त रिटेलर्स या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. सध्याच्या काळातील ग्राहकांच्या नवनवीन गरजा, आवडीनिवडी व प्राथमिकता यांना अनुसरून सर्वात नवे तंत्रज्ञान, उत्पादनांतील नावीन्य, डिझाईन फिलॉसॉफी आणि ट्रेंड्स यांचा समावेश आपल्या उत्पादनांमध्ये करण्यासाठी ब्रँडकडून सातत्याने केले जात असलेले समर्पित प्रयत्न हा या कार्यक्रमाचा प्रमुख विषय होता.

यावेळी कॅम्पस ऍक्टिव्हवेयर लिमिटेडने आपल्या नाविन्यपूर्ण फूटवेयर सोल्युशन्सची रेन्ज प्रस्तुत केली ज्यामध्ये नायट्रोफ्लाय, नायट्रोबूस्ट, एअर कॅप्स्यूल प्रो आणि ओजीज् या चार नवीन तंत्रज्ञानांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी या चार तंत्रज्ञानांवर विशेष भर दिला जात आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरतील अशा या रेन्ज कधीही, कुठेही एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज जाता यावे यासाठी तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये फॅशन, लाइफस्टाइल आणि आराम यांचा उत्तम मिलाप साधण्यात आला आहे. कॅम्पस ऍक्टिव्हवेयर ब्रँडप्रती रिटेलर्सच्या सकारात्मक भावना, ब्रँडवर त्यांच्याकडून सातत्याने दिला जाणारा भर आणि त्यांची ब्रँडप्रती निष्ठा यामुळे त्यांच्या व ब्रँडमधील सहयोगात मूल्य व विश्वसनीयता यांची वाढ होत असल्याबद्दल कंपनीकडून त्यांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले.

कॅम्पस ओजीज् कलेक्शन ही अतिशय उत्तम फॅशन ऍक्सेसरी आहे जी युवा स्वयं-अभिव्यक्तीसाठी डिझाईन करण्यात आली आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वातील अनोखेपण आणि मजबूत आत्मविश्वास प्रदर्शित केला जावा हा यामागचा उद्देश आहे. “फ्लाईंग इज द न्यू रनिंग” हा संदेश देणारी, नायट्रोफ्लाय तंत्रज्ञानाने परिपूर्ण नायट्रोफ्लाय रेन्ज, आपल्या युजर्सना स्वतःच्या मर्यादांना दूर सारून, सर्वोत्तम कामगिरी बजावता यावी, वजनाला हलक्या, रिस्पॉन्सिव्ह कूशनिंगमुळे सर्वात जास्त आराम देखील मिळावा यासाठी हे डिझाईन करण्यात आले आहे. कॅम्पस नायट्रोबूस्ट, एक क्रांतिकारी मिडसोल बाऊन्सियर आहे, हाय एनर्जी रिटर्न प्रदान करते आणि आता यामध्ये एअर टर्बो टेक्नॉलॉजीचा देखील समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे तुमचे पाय संपूर्ण दिवसभर थंड, ताजेतवाने आणि आरामशीर राहतात. याच्या सोलमध्येच एक नाविन्यपूर्ण एअर सर्क्युलेशन सिस्टिम बसवण्यात आली आहे. एअर कॅप्स्यूल प्रो टेक रेन्जमध्ये टाचेच्या भागात संरक्षणासाठी कुशनिंग देण्यात आले आहे त्यामुळे स्नायू, सांधे व टेन्डन्स सुरक्षित राहतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी

धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी कोल्हापूर, : महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्य…