no images were found
एसपी वेल्थ प्रवर्तक अनिल पाटील यांचा एफएफएफ क्लबच्या डायमंड पुरस्कारने सन्मान
कोल्हापूर – येथील एसपी वेल्थचे प्रवर्तक अनिल पाटील यांचा मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात दि इकॉनॉमिक टाइम्स प्रस्तुत एफएफएफ क्लबच्या डायमंड पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
दि इकॉनोमिक टाइम्स व एसएसएल अकॅडमीच्या वतीने देशातील म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागारांची चौथी राष्ट्रीय परिषद मुंबई येथे जेडब्ल्यू मॅरीयट सहार या हॉटेलमध्ये नुकतीच झाली.
देशातील भांडवली बाजार मोठ्या जोमाने वाढत आहे. वाढत्या बाजाराचा फायदा सर्वसामान्य गुंतवणुकदारांपर्यंत पोहचला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी दि इकॉनॉमिक टाइम्स व एसएसएल अकॅडमी यांच्या वतीने म्युच्युअल फंड सल्लागारांच्या फायनान्शियल फ्रिडम फ्रॅटर्निटी या राष्ट्रीय स्तरावर क्लबची स्थापना झाली आहे. म्युच्युअल फंड सल्लागारांना काळानुसार होणारे व्यवसायातील बदल, येणारी आव्हाने पेलण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी करणे, बाजाराचे संशोधन आणि व्यवसाय वृद्धीबाबत माहिती क्लबच्या वतीने दिले जाते. गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षर करणे, त्यांना आर्थिक स्वातंत्र्याबद्दल जागृती निर्माण करणे, बाजारातील चढउतार आणि अस्थिरतेवर मात करण्यासाठी पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करणे याविषयी सातत्याने प्रशिक्षण दिले जाते.
दरम्यान, या परिषदेचे उद्घाटन चाणक्य नीतीचे प्रख्यात लेखक राधाकृष्णन पिलाई व कोलकत्ताचे कनक जैन यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवसांच्या परिषदेमध्ये दिग्गजांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये आयसीआयसीआय म्युच्युअल फंड सीईओ एस नरेन, एक्सिसचे माधव अयंगार, मोतिलाल ओसवालचे अखिल चतुर्वेदी, एचडीएफसीचे नवनीत मुनोत, एम. व्ही. स्पाइसेसचे नीलम गेहाणी, एस. पी. जैन, ग्लोबल बिझनेस स्कूलचे परिमल मर्चंट, आम्फी चेअरमन बाला सुब्रमण्यम, एचएसबीएसचे कैलाश कुलकर्णी व कलाकार प्रतीक गांधी यांच्याकडून व्यवसायातील व्यवस्थापन, भांडवली बाजार घडामोडी अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
आर्थिक निरक्षरतेमुळे जिल्हयात शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहेत. समाजातील आर्थिक साक्षरता वाढीस लागली पाहिजे, लोकांच्याकडे आर्थिक शहाणपण आले पाहिजे यासाठी एसपी वेल्थचे प्रवर्तक अनिल पाटील यांचे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आजपर्यंत आर्थिक साक्षरता आणि आर्थिक नियोजनातून गुंतवणूक कशी असावी, या विषयी कार्यशाळा, विविध दैनिकांतून आर्थिक साक्षरतेसंबंधी 200 हून अधिक लेख, महिलांचे आर्थिक नियोजन हे पुस्तक प्रकाशित झाले आहे या कार्याची दखल घेऊन दि इकॉनॉमिक टाइम्स व फायनान्शियल फ्रिडम फ्रॅटर्निट क्लबने त्यांना करण भगत सीईओ ३६० वन व श्री. रॉय यांच्या हस्ते डायमंड क्लब पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.