no images were found
‘इक कुडी पंजाब दी’मध्ये मोनिका खन्ना साकारणार एक शक्तिशाली व्यक्तिरेखा
‘झी टीव्ही’वरील आगामी ‘इक कुडी पंजाब दी’ ही एक नाट्यपूर्ण कथानक असलेली मालिका असून सशक्त कथानक आणि सुस्पष्ट रेखाटलेल्या व्यक्तिरेखांमुळे ती प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवील. ‘डोम एंटरटेन्मेंट’ संस्थेची निर्मिती असलेल्या या मालिकेचे कथानक अकस्मात येणार््या कलाटण्यांनी उत्कंठावर्धक बनेल. पंजाबमधील कपूरथला या माजी संस्थानात मालिकेचे कथानक घडते. जाट जमीनदार घराण्यात जन्मलेल्या हीर ग्रेवाल या तरूण, सुंदर आणि उत्साही तरुणीच्या जीवनाची कथा यात सादर करण्यात आली आहे. आपल्या कुटुंबियांना सुखी ठेवणे, ही आपली प्रमुख जबाबदारी आहे, असे हीरला वाटते. पण अटवाल कुटुंबात लग्न केल्यानंतर तिच्या जीवनाला एकदम अशी कलाटणी मिळते की सर्वजणांना एकच प्रश्न पडतो, “जिसने माँगी सबकी खैर… वक्त ने किया… क्यूं उससे बैर?”
अविनाश रेखी आणि तनिशा मेहता हे कलाकार या मालिकेत अनुक्रमे रांझा आणि हीर या प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत, अशी आम्हाला अलिकडेच माहिती मिळाली. पण मालिकेत खमंगपणा आणण्यासाठी मोनिका खन्ना यात तेजिंदर कौरची भूमिका साकारणार आहे. अटवाल कुटुंबातील तेजी ही एक प्रभावशाली व्यक्तिरेखा असते. तिला कुटुंबात मान असतो आणि तिचा अधिकारही कुटुंबियांवर चालतो. तिच्या घरातील सर्व गोष्टींवर तेजी लक्ष ठेऊन असते. त्यात आपल्या सासू-सासर््यांची काळजी घेण्यापासून आपला व्यवसाय-धंदा वाढविणे आणि आपल्या राजकीय कारकीर्दीला वर नेणे यासारख्या सार््या गोष्टींचा समावेश आहे. हीरच्या विवाहानंतर तिच्या जीवनात काय काय घडते, ते पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरेल, हे निश्चित. या नव्या मालिकेकडून मोनिकाला खूपच अपेक्षा असल्या, तरी हीरच्या सुंदर वाटचालीचा प्रवास पाहताना प्रेक्षक पडद्याला खिळून राहतील, यात शंका नाही.