no images were found
‘भाबीजी घर पर है’मधील अंगूरी भाबी आणि मनमोहन तिवारी यांनी इंदौरमध्ये उत्साहात साजरा केला गणेशोत्सव
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या चाहत्यांना उत्साहवर्धक ट्रीट मिळाली, जेथे त्यांची लाडकी अंगूरी भाबी (शुभांगी अत्रे) आणि तिचा उत्साहपूर्ण लड्डू के भैया मनमोहन तिवारी (रोहिताश्व गौड) गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी इंदौरमध्ये आले होते. इंदौरियन शुभांगी यांनी त्यांच्या आवडत्या स्थळांना भेट दिली, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला, खरेदीचा आनंद घेत संस्मरणीय आठवणी साठवल्या. तसेच रोहिताश्व यांनी देखील त्यांच्या कुटुंबासोबत खरेदी करण्याचा आणि शहरामध्ये फेरफटका मारण्याचा आनंद घेतला. दोघेही इंदूरी चाहत्यांसोबत उत्साहाने गणेशोत्सवामध्ये सामील झाले, तसेच प्रतिष्ठित छप्पन दुकान येथे स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील घेतला.
अंगूरीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्हणाल्या, ”इंदौरचे माझ्या मनात खास स्थान आहे आणि गणेशोत्सव सण साजरा करण्यासाठी माझ्या मूळगावी परतण्याचा अनुभव अत्यंत उत्साहवर्धक होता. प्रत्येकवेळी आमचे चाहते आमच्यावर प्रेम व आपुलकीचा वर्षाव करतात, जे पाहून मी भारावून जाते. हा प्रसंग देखील काही वेगळा नव्हता. संपूर्ण वातावरण अविश्वसनीय उत्साहाने भरून गेले होते, तसेच चाहत्यांसोबत गणेश महाआरतीमध्ये सामील होण्याचा अनुभव उत्साहवर्धक होता. मी इंदौरला आल्यानंतर प्रत्येक वेळी संस्मरणीय आठवणी सोबत घेऊन जाते. मला बाप्पावर दृढ विश्वास आहे आणि माझे प्रिय लड्डू के भैया यांच्यासेाबतची ही ट्रीप माझ्या कायमस्वरूपी स्मरणात राहिल.