Home आरोग्य रस्त्यात हार्ट अटॅक आलेल्या  डॉक्टरच्या वडिलांचे महिला पोलिसाने CPR देत वाचवले प्राण

रस्त्यात हार्ट अटॅक आलेल्या  डॉक्टरच्या वडिलांचे महिला पोलिसाने CPR देत वाचवले प्राण

2 second read
0
0
165

no images were found

रस्त्यात हार्ट अटॅक आलेल्या  डॉक्टरच्या वडिलांचे महिला पोलिसाने CPR देत वाचवले प्राण

ग्वाल्हेर :  पायी जात असलेल्या ६२ वर्षीय सेवानिवृत्त अकाऊण्टंटला अचानक हृदयविकाराचा झटका आला. चक्कर आल्याने ते रस्त्यावर पडले. जवळच कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस सोनम पराशर यांना घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. इतकंच नाही, तर वेळ न दवडता सीपीआर [कार्डिओपल्म्युनरी रिससिटेशन] देऊन त्यांचे प्राणही वाचवले. त्यांना पोलिसांच्या वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले, सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही संपूर्ण घटना सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील गोला मंदिर चौकात घडली. ६२ वर्षीय सेवानिवृत्त अकाऊण्टंट अनिल उपाध्याय नेहमीप्रमाणे पायी निघाले होते. अचानक हार्ट अटॅक आल्याने ते जागीच कोसळले. रुग्णालयात नेण्यास किंवा सीपीआर देण्यास आणखी काही काळ उशीर झाला असता, तर कदाचित अनर्थ घडू शकला असता. एसएसपी अमित सांघी यांनी महिला पोलिसाच्या कार्याचे कौतुक करत त्यांचा सन्मान करण्याची घोषणा केली आहे.

२०१६ च्या बॅचच्या वाहतूक पोलीस सोनम पराशर यांनी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतल्याची माहिती दिली. अशी घटना आढळल्यास सीपीआर देऊन जीव कसा वाचवता येईल, हे पोलीस प्रशिक्षणात शिकवले जाते. प्रशिक्षणात शिकलेल्या उपाय योजनांच्या मदतीने प्रथमोपचार दिले. माझ्या प्रशिक्षणामुळे एका वाटसरूचा जीव वाचला याचा मला आनंद आहे, अशा भावना सोनम पराशर यांनी व्यक्त केल्या.उपाध्यायची प्रकृती आता ठीक आहे. अनिल उपाध्याय हे वीज कंपनीतून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा अमित उपाध्याय गुरुग्राम मेदांता येथे डॉक्टर आहे. घटनेच्या वेळी तो घरीच होता. याविषयी माहिती देताना डॉ. अमित उपाध्याय म्हणाले की, वाहतूक पोलीस सोनम पराशर यांनी माझ्या वडिलांना नवजीवन दिले आहे. ज्यावेळी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला, तो वेळ मौल्यवान होता. त्यावेळी जे डॉक्टर करतात, तेच पराशर यांनी केले. त्यांचे हे कौतुकास्पद कार्य कधीही विसरता येणार नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…