Home मनोरंजन अभिषेक मलिकचा ‘जोकर’ अवतार ऑन-स्क्रीन धुमाकूळ घालणार, आणि ‘जमाई नं.1’ मध्ये ऑफ-स्क्रीन हास्यही निर्माण करणार!

अभिषेक मलिकचा ‘जोकर’ अवतार ऑन-स्क्रीन धुमाकूळ घालणार, आणि ‘जमाई नं.1’ मध्ये ऑफ-स्क्रीन हास्यही निर्माण करणार!

3 second read
0
0
58

no images were found

अभिषेक मलिकचा ‘जोकर’ अवतार ऑन-स्क्रीन धुमाकूळ घालणार, आणि ‘जमाई नं.1’ मध्ये ऑफ-स्क्रीन हास्यही निर्माण करणार!

झी टीव्हीवरील ‘जमाई नं.1’ ही मालिका एका अनपेक्षित वळणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘नील’ची भूमिका साकारत असलेला अभिषेक मलिक आगामी भागात भयानक ‘जोकर’चा मास्क घालून त्याची सासू कंचन (पापिया सेनगुप्ता) चे अपहरण करेल आणि त्यामुळे संपूर्ण कथानकात मोठा गोंधळ निर्माण होतो. कंचन या घटनेचा फायदा घेऊन नील मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तणाव निर्माण होतो आणि कथानकाला एक मोठे वळण मिळते.

जरी मास्क कथेमध्ये गडद आणि गंभीर वातावरण तयार करतो, तरी ‘बिहाईंड द सीन्स’ या मास्कने धमाल उडवली. हे गंभीर दृश्य चित्रित झाल्यानंतर अभिषेकने स्वतःला एका मजेशीर प्रँकस्टरमध्ये बदलले. अभिषेकने जोकरच्या मास्कचा वापर करून त्याचे सहकलाकार आणि क्रू सदस्यांशी मस्करी केली. कंचनला अचानक चकित करणे, पार्श्वभूमीतील कलाकारांना आणि मेकअप टीमला घाबरवणे अशा अनेक गोष्टी करत हास्याची एकही संधी त्याने दवडली नाही! पण एवढ्यावरच तो थांबला नाही. ‘जोकर’च्या अनपेक्षित आणि थरारक व्यक्तिमत्त्वाने खूप दिवसांपासून प्रभावित असलेला अभिषेक म्हणाला की मास्क घालून त्याने त्याचा आवडता अभिनेता जोआकिन फिनिक्स आणि त्याच्या प्रसिद्ध ‘जोकर’ पात्राला एक छोटीशी श्रद्धांजली दिली आहे.

अभिषेक म्हणाला, “मला नेहमीच ‘जोकर’चे आकर्षण वाटले आहे. त्याच्यात काही तरी अनोखे आणि खोल अर्थ असलेले काहीतरी आहे, जे माझ्या मनात घर करून बसले आहे. मला अजूनही आठवतंय, मी जेव्हा ‘जोकर’ चित्रपट पाहिला, तेव्हा जोआकिन फिनिक्सच्या अभिनयाने मी खूपच प्रभावित झालो होतो. त्यामुळे जेव्हा मला कळले की एका सीनसाठी मला जोकरचा मास्क घालायचा आहे, तेव्हा मी खूपच उत्साही झालो. अर्थात हा चित्रपटाप्रमाणे पूर्ण मेकअप लूक नव्हता पण मी मास्क घातला होता. पण खरं सांगायचं तर जेव्हा  शॉट संपला तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी मास्क घालून लोकांवर नजर ठेवायला सुरुवात केली – आधी सहकलाकारांवर, मग पार्श्वभूमीतील कलाकारांवर आणि काही क्रू सदस्यांवर. मजेची गोष्ट म्हणजे त्यांना अजिबात कळले नाही की मी आहे! ते अजूनही घाबरलेले होते! त्या दिवशी फक्त त्यांना अजाणतेपणाने पकडण्यासाठी मी किमान 10 वेळा मास्क घातला असेल. ते मजेशीर प्रँक बनले. अशा क्षणांमुळे दीर्घकालीन शूटिंगचे दिवसही मजेदार वाटतात – ज्यामुळे ऊर्जा टिकून राहते आणि एक टीम म्हणून आम्ही सगळे आणखी जवळ येतो.”

तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे ‘जोकर’च्या मास्कने ऑन-स्क्रीन थरार आणला, तसाच त्याने ऑफ-स्क्रीन अनपेक्षित हशा आणि धमालही आणली.

आगामी भागात प्रेक्षक पाहतील की कशा प्रकारे कंचन रिद्धीला (सिमरन कौर) नील मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे असे पटवून देण्यासाठी वेगवेगळे उपाय करते. काय नील स्वतःला मानसिकदृष्ट्या स्थिर सिद्ध करू शकेल का?

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…