
no images were found
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल आता १२०० रुपये
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ
मुंबई : मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही. दर दिवशी या मार्गावरून नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने प्रवास करत या दोन्ही शहरांमध्ये ये- जा करणं अनेकांच्याच सवयीचा भाग झाला आहे. यामध्ये रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्गानं प्रत्येकजण सोयीप्रमाणे प्रवास करतो. पण, आता या प्रवासाचाही फटका शिळाला बसणार आहे.
मुंबई पुणे एक्प्रेस वेवरील टोल तब्बल 18 टक्क्यांनी वाढणार आहे. 1 एप्रिल 2023 हे नवे दर लागू होणार आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे च्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्यात येईल अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्ये काढली होती, त्याच धर्तीवर ही टोलवाढ होणार आहे.