
no images were found
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार
खडकवासला : खडकवासला धरण साखळीत गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. साखळीतील चारही धरण १०० टक्के भरली आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता १९ हजार २८९ क्युसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणे पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरलेली आहेत. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे धरणातील साठ्यात वाढ होत असून दुपारी एक-दोन वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात अंदाजे २२ ते २५ हजार क्युसेक विसर्ग सोडला जाण्याची दाट शक्यता आहे, असे खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे योगेश भंडलकर यांनी सांगितले.