Home Uncategorized माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत

माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत

12 second read
0
0
26

no images were found

माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 

कोल्हापूर: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे. माजी सैनिकांनी संबंधित कार्याबद्दलची प्रमाणपत्रे, गुणपत्रे, सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्र या कागदपत्रांसह अर्ज दिनांक 20 सप्टेंबर 2024 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) भिमसेन चवदार यांनी केले आहे.

            जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, वादन इ. क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा,  अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 10 वी  तसेच 12 वी च्या परीक्षेमध्ये 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण माजी सैनिक, विधवांचे पाल्य, पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 प्राप्त प्रकरणामधुन प्रत्येक शैक्षणिक बोर्डातील गुणानुक्रमे पाच प्रकरणे शिफारस करुन सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहेत. अधिक माहितीकरीता दुरध्वनी क्रमांक 0231-2665812 वर संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…