
no images were found
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खून अन् आरोपीचीही जमावाकडून हत्या
नांदेड : दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा आणि सलून मालकाचा वाद पेटला आणि वादात सलून चालकाने चक्क 22 वर्षीय तरुण ग्राहकाची हत्या केली. थरकाप उडवणारा हा प्रकार इथेच थांबला नाही तर हत्या केल्याच्या रागातून काही संतप्त लोकांनी सलून चालकाचाही खून केला. या प्रकरणाने नांदेडसह संपुर्ण महाराष्ट्र हादरलाय. जिल्ह्यातील किनवट तालुक्यात बोधडी येथे हा प्रकार घडला आहे. व्यंकटी सुरेश देवकर असे मृतक तरुणाचे नाव असून अनिल शिंदे असे मृतक सलून चाकलाचे नाव आहे.
व्यंकटी देवकर हा गुरुवारी संध्याकाळी दाढी करायला सलूनमध्ये गेला होता. दाढीच्या पैशाच्या कारणावरुन सलून चालक आणि त्याच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या सलून चालकाने दाढी करण्यासाठी वापरला जाणाऱ्या शस्त्राने व्यंकटी याचा गळा कापला.त्या मुळे त्यानंतर सलून चालक पळून गेला. मात्र अज्ञात जमावाने सलुन चालकाला शोधलं आणि त्याला ठार मारले. मार्केटमध्ये असलेली सलून दुकानही पेटवली. या घटनेने बोधडी येथे तणावाचे वातावरण पसरले होते. एकाच दिवशी झालेल्या या दोन हत्याकांडाने नांदेड हादरले पण अशा घटनांमुळे पोलिसांचे भय उरले नाही का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. या प्रकरणाने नांदेडसह संपुर्ण महाराष्ट्र हादरलाय.