no images were found
दख्खनच्या राजा : मंडपामध्ये आरतीसाठी आणि दर्शनासाठी जिल्हयाचे पालकमंत्री ना..दिपकराव केसरकर उपस्थित राहणार…
कोल्हापूर (प्रतिनिधी ): दिलबहार तालीम मंडळ रविवार पेठ कोल्हापूर या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दिलबहारचा गणेशोत्सव एक धर्मोत्सव आणि लोकोत्सव अशा अर्थाने अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये संपन्न होत असतो.. उद्या अनंत चतुर्थी उद्या विसर्जनाची मिरवणूक ही मुख्य मार्गावर सकाळी दहा वाजता सहभागी होत आहे..
आज संध्याकाळी सहा ते साडेआठ या वेळेमध्ये…
दख्खनचा राजा श्री गणेश मंगलमूर्ती समोर काही विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.. यंदाची दख्खननाच्या राजा ची गणेश मूर्ती ज्या दातृत्वान गणेशभक्तांनी अर्पण केली ते उद्योजक जनार्दन पाटील आणि त्यांचा सहपत्नी तसेच परिवार सदस्यांना दिलबहार तालीम संस्थेच्या वतीने यथोचित सन्मानित करण्यात येणार आहे…त्याच प्रमाणे काही सत्कार सुद्धा या प्रसंगी होणार आहेत सर्वात महत्त्वाचं आजच्या या मंगल आरती च्या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दीपक रावजी केसरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे त्यांच्यासोबत नियोजन मंडळाची कार्याध्यक्ष आदरणीय आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आपण या कार्यक्रमास माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा उपस्थित रहावे असे आवाहन माध्यम संपर्कप्रमुख या नात्याने मी पद्माकर कापसे तसेच तालीम संस्थेचे अध्यक्ष विनायक फाळके उत्सव समितीचे अध्यक्ष जनार्दन पाटील आणि समस्त उत्सव समिती सदस्य आणि दिलबर परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद